कबुलायतदार गावकर प्रश्नी महसूल व वन मंत्र्यांसोबत पुन्हा बैठक घेणार…

राजन तेली; स्थानिकांची दुसरी बाजू मांडून लवकरच न्याय मिळवून देणार..

आंबोली,ता.७: आंबोली कबुलयातदार गावकर प्रश्न सोडवला मात्र महसूल ची जमीन आणि वन ची जमीन एकत्र करून वाटप होण्यासाठी निर्णय घेणे आवश्यक आहे.तसेच कुटुंब निश्चिंती आणि यादी प्रसिद्ध होणे आवश्यक आहे तसेच ग्रामसभेचा ठराव विचारात घेतलेला नाही . शासनाकडून ते राहिलेले आहे. त्यामुळे शासनाकडे आम्ही पुन्हा बैठकीची मागणी केलेली आहे. आशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजन तेली यांनी दिली.

दरम्यान आम्ही दिलेला मसुदा शासनापर्यंत पोहोचला का याबाबत संशय असून स्थानिक ग्रामसभेने केलेल्या ठराव देखील विचारात घेतला गेलेला नाही त्यामुळे दुसरी बाजू मांडली गेली नाही त्यामुळे पुन्हा एकदा स्थानिक ग्रामसभेचा ठराव घेऊन संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून उर्वरित प्रश्न लवकर सोडू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली ते सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग माजी नगराध्यक्ष संजू परब माजी नगरसेवक आनंद नेवगी, एकनाथ नाडकर्णी सुधीर दळवी रवी मडगावकर, अजय गोंदावले,बंटी पुरोहित, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page