⚡सावंतवाडी ता.०७-: कै. वाळके मास्तर जयंती निमित्त उद्या दि. 8 ऑगस्ट रोजी सावंतवाडी शहरांमध्ये स्वराज्य संघटना व आजी-माजी विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. सकाळी ठीक 8 वाजता वाळके मास्तर व्यायाम शाळेमध्ये स्वराज्य संघटना व आजी माजी विद्यार्थ्यांकडून वाळके मास्तर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर कित्येक दिवस सावंतवाडी नगर परिषदेचे स्विमिंग पूल बंद होते ते स्वराज्य संघटनेच्या पुढाकाराने उद्या सुरू होणार आहे व त्याचा शुभारंभ सकाळी होणार आहे.याबाबतची माहिती स्वराज्य संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान सकाळी 9 वाजता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्वराज्य संघटनेमार्फत 60 खुर्च्या भेटवस्तू म्हणून देण्यात येणार आहेत सदर खुर्च्यांचा लाभ पेशंट व स्टाफ साठी व्हावा हा उद्देश आहे तसेच अपघात विभागाला पाण्याची एक्वागार्ड मशीनही देण्यात येणार आहे. अशा या सेवाभावी उपक्रम कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सावंतवाडी शहराचे प्राख्यात जेष्ठ वकील बापू गव्हाणकर, माजी नगरसेवक सुधीर आरिवडेकर, उद्योजक राजन आंगणे, जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, उद्योजक राजू भालेकर, मंगेश उर्फ राजू नाईक वगैरे उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष अमोल साटेलकर यांनी केलेले आहे या कार्यक्रमाला वाळके मास्तर प्रेमींनी उपस्थित राहावे असेही आव्हान त्यांनी केले आहे.
