⚡कणकवली ता.०७-: भजन प्रेमी व कला संघ कणकवली यांच्यावतीने येथील परमहंस भालचंद्र संस्थात जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन केले होते. यात श्री काशीकलेश्वर प्रासादिक मंडळ, कलमठने प्रथम क्रमांक मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे.श्री नटराज प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी द्वितीय तर श्री स्वरसंगम प्रासादिक भजन मंडळ कासरल तृतीय क्रमांक मिळवला. श्री गुरुप्रसाद प्रासादिक भजन मंडळ करंजे संघाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. उत्कृष्ट गायक चेतन गुरव. (श्री काशीकलेश्वर प्रासादिक भजन मंडळ, कलमठ), उत्कृष्ट पखवाज वादक- मयुर मेस्त्री
(सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळ, जानवली), उत्कृष्ट तबला वादक–प्रेम मेस्त्री (श्री गुरुप्रसाद प्रासादिक भजन मंडळ, करंजे), उत्कृष्ट झांजवादक- नागेश
शिरसाट ( श्री पिंपळेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नागवे), उत्कृष्ट कोरस – श्री साटम महाराज प्रासादिक भजन मंडळ, निरवडे, उत्कृष्ट अभंगाचे सादरीकरण – श्री नटराज प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी, उत्कृष्ट गजर सादरीकरण – श्री गुरुप्रसाद प्रासादिक भजन मंडळ करंजे यांनी वैयक्तिक स्वरुपातील पारितोषिके पटकाविली. स्पर्धेचे विनोद गोखले व मारुती मेस्त्री यांनी केले.स्पर्धा पार पडल्यानंतर बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यात मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना व वैयक्तिक स्वरुपात बक्षीसे प्राप्त केलेल्यांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी कणकवली भजन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी उपसभापती प्रकाश पारकर, पं.स.चे विस्तार अधिकारी रविकांत मेस्त्री, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश जेठे, उदय राणे, नारायण आर्डेकर,
जयप्रकाश मेस्त्री, गोपीनाथ लाड, सूदर्शन फोपे, एकनाथ सावंत, संदीप मेस्त्री, गणेश पारकर, उमेश परब आदी उपस्थित होते.
