⚡वेंगुर्ला ता.०७-: वेंगुर्ला भाजपाच्यावतीने ‘आजादी का अमृत महोत्सव‘ अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई यांनी दिली.
दि. ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभक्तीपर गीत, तिरंगा यात्रा, मेळावे, दि. ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान ‘रघुपती राघव राजाराम‘ हे भजन व ‘वंदे मातरम‘ हे गीत लावून प्रभात फेरी काढली जाणार आहे. दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालवधीत ‘हर घर तिरंगा‘, भारत मातेसाठी माती हातात घेऊन देशासाठी स्वःताला समर्पित करण्याची शपथ घेऊन शिला फलकाचे समर्पण, पंचप्राण शपथ, वसुधा वंदन, विरोंका वंदन तसेच शहरी व ग्रामीण भागात ‘मिट्टी यात्रा‘ काढली जाणार आहे. दि. १४ रोजी देशाच्या फाळणीच्यावेळी ज्यांनी प्राण गमावले त्या सर्वांना ‘फाळणी विभिषिका दिनानिमित्त‘ श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तसेच या दिवशी मुक मिरवणूक काढून त्या मिरवणुकीचा समारोप स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिवीर, हुतात्मा चौक अशा ठिकाणी करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने शहरी व ग्रामीण भागात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
या सर्व कार्यक्रमांची बुथस्तरापर्यंत माहीती व्हावी यासाठी तालुका कार्यकारणी, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, सरपंच, उपसरपंच यांची बैठक तालुका कार्यालयात संपन्न झाली.
