संपर्क प्रमुख शैलेश परब यांचे आवाहन:चौकुळं येथील सभेत दीपक केसरकर यांच्यावर केली टीका
⚡आंबोली, ता.०७-: राष्ट्रवादीचे कारण सांगून शिंदेगटात गेलेले दीपक केसरकर हे अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या गाडीच्या मागून धावत होते.उद्धव ठाकरे यांनी एमबीबीएस कॉलेज मंजूर करून १०० कोटी निधी देऊन हट्टी पणामुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होऊ शकले नाही इथला म्हणावा तसा विकास झाला नाही केवळ गोड बोलून घोषणा करायच्या आणि प्रॉपर्टी वाढवायची,मंत्री होऊन शिक्षणाचा जिल्ह्यात बट्ट्याबोळ केला. या सरकारने शेतकरी ,रोजगार,आरोग्य यासाठी काही केलं नसून महागाई वाढवली आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव साहेबांच्या पाठीशी राहा असे प्रतिपादन विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी चौकुळ येथे शेतकऱ्यांना खत वाटप कार्यक्रमात केले.
आंबोली मतदार संघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम प्रसंगी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब,बाळा गावडे,चंद्रकांत कासार, राजू शेटकर,रमेश गावकर, शब्बीर मणियार,अशोक सावंत,हिमांशू परब,विभागीय अध्यक्ष बबन गावडे,उपसंघटक उत्तम पारधी,खरेदी विक्री संघ माजी चेअरमन अरुण गावडे, संतोष पाताडे, शाखा प्रमुख रुपेश गावडे, तुकाराम गावडे, कृष्णा गावडे,दीपा गावडे,धीरूभाई गावडे,पंडव बाबू गावडे,शामल गावडे,जयवंती गावडे,सीताबाई ,राजश्री गावडे,प्रकाश गावडे,दीपक गावडे, भालचंद्र गावडे,वैष्णवी गावडे,सदाशिव गावडे,सुभाष गावडे,चंद्रकांत गावडे,शत्रूघन शेटये,सदानंद गावडे, तुकाराम गावडे,ग्रामपंचायत सदस्य कांशीराम राऊत, सुरेश गावडे,शशिकांत सावंत,शंकर (आबा) गावडे,शशीकांत सावंत,प्रकाश गुरव,डुबा राऊत,कान्हाजी गावडे,शंकर गावडे,अनिल गावडे,तसेच शेतकरी,महिला ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी माजी सभापती रमेश गावकर म्हणाले, चौकुळ आंबोली मतदारसंघातील लोक नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहिलेले आहेत. गद्दार ४० आमदारांमुळे भाजप सत्तेत असून शेतकऱ्यांवर अन्याय करत असून कोणतीही भरघोस मदत केलेली नाही,हे सरकार शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या हिताचे नाही.येणाऱ्या काळात शिवसेनेच्या पाठीशी राहा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवूया.जिल्हा परिषदेत देखील सत्ता आणूया.उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार म्हणाले,मोदींचे राजकारण हम करेसो कायदा अशा पद्धतीने आहे.पक्ष संस्था सर्व संपवण्याचे काम करून हुकूमशाहीकडे वाटचाल आहे.इथला आमदार पळपुटा दुटप्पी निघाला.राष्ट्रवादीतून दीपक केसरकर मातोश्री वर गेले तेव्हा शैलेश परब यांनी तिकीट देण्यासाठी शिफारस केली.मंत्रिपद दिल आता भाजप मध्ये गेला आपली प्रॉपर्टी वाढवत आहे. इथे शेतीसाठी अवजारे,खते,आरोग्य साठी औषधे नाहीत.शिवसेनेला पुन्हा उभारी देऊन भाजपला दूर ठेवा. उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत उर्फ बाळा गावडे म्हणाले, अच्छे दिन आएंगे,१५ लाख देऊ,पेट्रोल,गॅस,सर्व स्वस्त करणार पण चौपट महागाई केली. बँक खात्यातील पैसे मिनिमम बॅलन्स कट केले.भाजपने शिवसेनेवर आरोप केले. हिंदुत्व हिंदुत्व करून राष्ट्रवादी सोबत गेले.आता आरोप करणारे कुठे आहेत.देशाला सामान्य लोकांना भिकेला लावण्याचे काम केले,इथल्या आमदाराने शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला.कोर्टाचे नाव सांगतात पण इथे शिक्षक सोय झाल्याशिवाय इथल्या शिक्षकाना जिल्ह्याबाहेर सोडणार नाही असे कोर्टाला प्रतिज्ञापत्र द्यायला पाहिजे होते.आज जिल्ह्यात शिक्षणाची वाताहात झाली,मुलांच्या भवितव्यासाशी खेळ आहे.आज सरकारची नुकसान भरपाई नाही,कर्जमाफी नाही .यापूर्वी १९९५ पूवी शिक्षा म्हणून जो गडचिरोली आणि सिंधुदुर्ग होता मात्र सिंधुदुर्ग जिल्हा आज राज्यातील पर्यटन जिल्हा झाला आहे.हे काम बाळासाहेब यांनी केले. भाजप ने 2 कोटी लोकांना नोकऱ्याचे आश्वासन दिले मात्र बेरोजगारी वाढत आहे. नारायण राणे देखील ईडी ने संपत्ती जप्त होईल म्हणून भाजपात गेले तसा इथला आमदार देखील बोंब मारून मारून आता राणेंशी जोडीने आहे.इथला विकास काही नाही.विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब म्हणाले,इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे उद्धव साहेबांचा वाढदिवस समाजसेवेने साध्या पद्धतीने करीत आहोत, दीपक केसरकर ज्यावेळी मिंदे गटात गेले तेव्हा राष्ट्रवादीचे कारण सांगितले होते मात्र भाजप मध्ये अजित पवार यांनी शपथ गेल्यानंतर त्यांच्या गाडीच्या मागे धावत जाणारा हा मंत्री. राष्ट्रवादीत असताना शरद पवार यांनी त्याला मंत्री केलं नाही मात्र उद्धव ठाकरे यांनी हुशार म्हणून मंत्री केला मात्र तो अति हुशार निघाला. इथे मोठमोठ्या घोषणा केल्या.रोजगार कंपन्या कारखाने आशा घोषणा केल्या.मल्टीस्पेशालिटी चे हॉस्पिटल उद्धव ठाकरे यांच्या काळात १०० कोटी निधी आला मात्र वेत्ये गाव फुकट जमीन द्यायला तयार असताना केसरकाराच्या हट्टी पणामुळे होत नाही. उद्धव ठाकरे यांच्या काळात जिल्ह्याला निधी मिळाला मात्र हा आमदार बिनकामाचा असल्यामुळे विकास झाला नाही.आमदार जरी गेला तरी शिवसेना इथली जशी आहे तशीच राहिली.कोरोना काळात हा गायब होता मात्र फोन सुद्धा उचलून काम करू शकले असते.त्यामुळे याला आता पुन्हा संधी लोकांनी देऊ नये.शिवसेनेच्या पाठीशी ठाम राहून सर्वसामान्य लोकांसाठी चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करूया". यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना खत वाटप करण्यात आले.तसेच दूध सहकारी संस्थेला वजन काटा देण्यात आला.यावेळी या भागातील शिवसेनेचे कार्य जोमाने करणाऱ्या संतोष उर्फ बुधाजी पाताडे यांचाही उल्लेख शैलेश परब यांनी केला.
