Headlines

विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत क्रीडाक्षेत्रातही सहभाग घेऊन सर्वांगीण विकास साधावा….

श्री. दिलीप गिरप ; वेंगुर्ला येथे युवा नेमबाजांनी गाजवली मुंबई विद्यापीठ शूटींग स्पर्धा

वेंगुर्ला
शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे मुंबई विद्यापीठाच्या कोकण झोन-०४ अंतर्गत आयोजित पुरुष व महिला शूटींग स्पर्धेचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. कोकण विभागातील विविध महाविद्यालयांतील युवा नेमबाजांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या नेमबाजी कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
महिला गटातील एअर पिस्तुल प्रकारात चैत्राली करंगुटकर (बॅ.खर्डेकर महाविद्यालय) हिने प्रथम, समिका गावडे (बॅ.खर्डेकर महाविद्यालय) हिने द्वितीय, तर अमृता रेवंडकर (बॅ.खर्डेकर महाविद्यालय) हिने तृतीय क्रमांक मिळविला. ओपन साईट प्रकारात तन्वी पारकर (कणकवली कॉलेज) हिने प्रथम, कोमल झोरे (एस.पी.के. सावंतवाडी) हिने द्वितीय, तर रिया परब (एस.आर.एम. कुडाळ) हिने तृतीय क्रमांक पटकावला.
महिलांच्या पीप साईट प्रकारात साक्षी डांगे (डी.बी.जे. चिपळूण) हिने प्रथम क्रमांक मिळविला. ग्रीष्मा परब (एस.आर.एम. कुडाळ) हिने द्वितीय, तर सानिका गावडे (बॅ.खर्डेकर महाविद्यालय) हिने तृतीय क्रमांक पटकावला.
पुरुषांच्या पीप साईट प्रकारात शमित लाखे (वाय.बी.आर.टी. सावंतवाडी) याने प्रथम, सहीश तलमकर (एस.पी.के. सावंतवाडी) याने द्वितीय, तर विनय सावंत (ए.सी.एस. कॉलेज, ओरोस) याने तृतीय क्रमांक मिळविला. ओपन साईट प्रकारात मार्तंड झोरे (एस.बी. कीर लॉ कॉलेज) याने प्रथम, साहिल तावडे (कणकवली कॉलेज) याने द्वितीय, तर उमाजी कदम (एस.आर.एम. कुडाळ) याने तृतीय क्रमांक मिळविला.
पुरुषांच्या एअर पिस्तुल प्रकारात सहीश तलमकर (एस.पी.के. सावंतवाडी) याने प्रथम क्रमांक मिळविला. सर्वार्थ जाधव (बॅ.खर्डेकर महाविद्यालय) याने द्वितीय, तर अंकुश नाईक (बॅ.खर्डेकर महाविद्यालय) याने तृतीय क्रमांक पटकावला.
ओपन साईट पुरुष सांघिक अजिंक्यपदात एस.आर.एम. कॉलेज, कुडाळने प्रथम क्रमांक पटकावला. कणकवली कॉलेज, कणकवलीने द्वितीय, तर बी.के.एस.व्ही. कॉलेज, लांजाने तृतीय क्रमांक मिळविला. यावेळी
समारोपप्रसंगी वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विजेत्या तसेच सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विद्यापीठस्तरीय स्पर्धांमधून आपले क्रीडा कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणे ही उल्लेखनीय बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
“शूटींगसारख्या क्रीडाप्रकारातून एकाग्रता, शिस्त, संयम आणि आत्मविश्वास या गुणांचा विकास होतो. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत क्रीडाक्षेत्रातही सक्रिय सहभाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, कोकण विभागीय क्रीडा समिती सचिव प्रा. शशांक उपशेटे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, जिमखाना प्रमुख डॉ. कमलेश कांबळे, क्रीडा संचालक प्रा. जयसिंग नाईक, गुणवत्ता हमी कक्षाचे प्रा. सुदाम माने, कांचन उपरकर, डॉ. चंद्रकांत नाईक, प्रा. सदाशिव चुकेवाड यांच्यासह क्रीडा विभागातील प्राध्यापक, कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) धनराज गोस्वामी होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार – संपादक शेखर सामंत उपस्थित होते. यावेळी कोकण विभागीय क्रीडा समितीचे सचिव प्रा. शशांक उपशेटे, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे सचिव डॉ. चंद्रकांत नाईक, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, स्थानिक सल्लागार समिती सदस्य सुरेंद्र खामकर, उपरकर शूटिंग रेंजचे संचालक कांचन उपरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे प्रा. सुदाम माने,जिमखाना विभाग प्रमुख डॉ. कमलेश कांबळे आणि पर्यवेक्षक प्रा. दिलीप शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

You cannot copy content of this page