कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी राज्यातील खासदारांनी पाठपुरावा करावा:मोहन केळुसकर
⚡कणकवली ता.२३-: कोकण रेल्वे मार्ग हा भारताच्या कानाकोपऱ्याला जवळच्या अंतराने जोडणारा मार्ग आहे. भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त संख्येने प्रवासी गाड्यांसह मालवाहू गाड्या धावत आहेत. काही राज्यांतील प्रवाशी या मार्गावरुन आपल्या भागातूनही प्रवासी गाड्या सोडाव्यात अशी मागणी करीत आहेत. त्यामुळे या मार्गाचे दुपदरीकरण जलद गतीने सुरू व्हायला हवे. त्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय…
