युवा संास्कृतिक महोत्सवात खर्डेकर कॉलेजचे यश

⚡वेंगुर्ला ता.२३-: मुंबई विद्यापिठामार्फत घेण्यात आलेल्या सांस्कृतिक युवा महोत्सवात बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या फाल्गुनी अजित नार्वेकर हिने भरतनाट्यम या कला प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला. तर हर्षल मेस्त्री याने हार्मोनियम वादन तसेच भावगीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला.

  वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात झालेल्या या स्पर्धेत बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या निधी नाईक, सानिया वराडकर, कल्पेश परुळेकर, शितल कारेकर, गोपाळ सावंत आदींनी सहभाग घेतला होता. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर, सांस्कृतिक समितीचे चेअरमन प्रा. वामन गावडे, प्रा.विवेक चव्हाण, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, प्रा.गायकवाड यांनी अभिनंदन केले.
You cannot copy content of this page