तुळशीच्या पानावर विठ्ठल रेखाटून भंडारी हायस्कूलचे नाव केले रोशन…

पार्थ मेस्त्री यांच्या कलेचे सेक्रेटरी साबाजी करलकर यांनी केले कौतुक

मालवण दि प्रतिनिधी
तुळशीच्या पानावर रांगोळीतून प्रतिमा रेखाटणे हि खूपच आव्हानात्मक कलाकृती आहे. पार्थ मेस्त्री याने इतक्या लहान वयात तुळशीच्या पानावर कमीतकमी वेळात विठ्ठलाची रंगावलीद्वारे कलाकृती साकारून आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला गवसणी घातली. पार्थ याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवत भंडारी एज्युकेशन सोसायटी व आपल्या हायस्कुलचे नावही रोशन केले आहे, पार्थचे यश हे भंडारी हायस्कुलसाठी नेहमीच गौरवास्पद राहील, असे प्रतिपादन भंडारी एज्युकेशन सोसायटी (मुंबई) मालवणचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर यांनी येथे बोलताना केले.

तुळशीच्या पानावर श्री विठ्ठलाची प्रतिमा रांगोळीद्वारे साकारणाऱ्या मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी पार्थ मेस्त्री याच्या या कलाकृतीची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाल्याने त्याच्या या यशाबद्दल प्रशालेतर्फे पार्थ मेस्त्री याचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर यांच्या हस्ते पार्थ याला शाल, श्रीफळ, पुष्पगुछ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक हणमंत तिवले, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, सेवानिवृत्त शिक्षक ध्रुवकुमार रानडे, कलाशिक्षक अरविंद जाधव, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, आर बी देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी श्री खोत यांनी पृथ्वी ही एक प्रयोगशाळा असून या शाळेत प्रत्येकजण हा धडा शिकायला आलेला असतो आपणाला कोणता धडा शिकायचा आहे हे ठरविले पाहीजे पार्थ मेस्त्री याने मिळविलेले यश हे गौरवास्पद आहे त्याच्या यशाने एक आदर्श निर्माण केल्याचे सांगितले तर कलाशिक्षक अरविंद जाधव यांनी कोणत्याही कलेची मूलभूत जाण करून घेणे महत्वाचे असून पार्थ याने लहान वयात चित्रकला, रांगोळी यातील मूलभूत अंग व बारकावे हेरले आहेत, म्हणूनच आज त्याने दैदिप्यमान यश मिळविले असून इतर विद्यार्थ्यांनीही यातून प्रेरणा घ्यावी, असे सांगितले.

यावेळी ध्रुवकुमार रानडे यांचेही समयोचित भाषण झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई यांनी केले. आभार आर. डी. बनसोडे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

You cannot copy content of this page