चौके हायस्कूल येथे संपन्न झाला विज्ञान मेळावा
मालवण (प्रतिनिधी)
मालवण पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे चौके येथील भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालयात आयोजित विद्यार्थी विज्ञान मेळाव्यातील वक्तृत्व स्पर्धेत वेदांत शिवप्रसाद नाईक (इ. ९ वी, टोपीवाला हायस्कुल मालवण) याने प्रथम क्रमांक पटकावीला. तर दिव्या दत्तात्रय गोलतकर (इ. ९ वी, भंडारी ए. सो. हायस्कुल मालवण) हिने द्वितीय क्रमांक मिळविला. या दोघांचीही जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड झाली आहे.
या दोन्ही विजेत्यांना शिक्षण विस्तार अधिकारी श्री. राऊत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी टोपीवाला हायस्कुल व भंडारी हायस्कुलचे शिक्षक उपस्थित होते.
