चौके देवळी रस्त्यांची स्वखर्चाने केली डागडुजी

मनसेच्या प्रीतम गावडे, विनोद सांडव आणि व्यावसायिक नाना आंबेरकर यांचा उपक्रम

मालवण दि प्रतिनिधी

मालवण तालुक्यातील चौके देवली या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्डयामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनल्याने वाहनचालक, पादचारी यांना होणारा त्रास टाळण्यासाठी चौके येथील युवा उद्योजक व महाराष्ट्र सैनिक प्रितम गावडे, मनसे माजी तालुका अध्यक्ष विनोद सांडव व जेष्ठ व्यावसायिक नाना आंबेरकर यांनी या रस्त्याची स्वखर्चाने डागडुजी केली आहे.

चौके देवली या रस्त्यावर खड्डे पडल्याने हा मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला होता. या खड्डेमय रस्ता प्रश्नी प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र पावसाळा कालावधी लक्षात घेता डांबरीकरण शक्य नसल्याची स्थिती आहे. खड्डेमय रस्त्याचा प्रश्न गंभीर बनल्याने वाहन चालक, पादचारी त्रस्त झाले होते
वाहन चालक, पादचारी यांना होणारा त्रास लक्षात घेता चौके येथील युवा उद्योजक व महाराष्ट्र सैनिक प्रितम गावडे, मनसे माजी तालुका अध्यक्ष विनोद सांडव व जेष्ठ व्यावसायिक नाना आंबेरकर यांनी स्वखर्चाने रस्त्याची डागडुजी केली आहे. याबाबत वाहन चालक, पादचारी यांनी आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page