⚡मालवण ता.२२-: युवासेनेच्या कोकण सचिव पदी नियुक्ती झालेल्या जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट यांचा मालवण तालुका युवासेना, युवती सेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्यावतीने मालवण येथे सत्कार करण्यात आला.
कोकण सचिवपदी नियुक्त झालेल्या मंदार शिरसाट यांनी येथे भेट दिली. यावेळी येथील हॉटेल हेरिटेज येथे बैठक पार पडली. यावेळी कुडाळ मालवण युवती सेना समन्वयक शिल्पा खोत, तालुका समन्वयक मंदार ओरसकर, कुडाळ युवा सेना शहराध्यक्ष संदीप महाडेश्वर, कुडाळ युवा सेना शहर समन्वयक अमित राणे, निनाक्षी शिंदे, सिद्धेश मांजरेकर, अक्षय रेवंडकर, रोहन पालव, विनीत भट, अमेय देसाई, निखिल नेमळेकर, उमेश चव्हाण, अमित भोगले, राहुल सावंत, गणेश नेरुरकर, तेजस लुडबे, किशोर कासले, दर्शन म्हाडगूत, राहुल परब, शशांक माने, रोशन कांबळे, सिद्धेश चव्हाण, संतोष माणगावकर, अक्षय वालावलकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मालवण तालुका युवा सेनेच्या कामकाजाचा श्री. शिरसाट यांनी आढावा घेत युवासेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरासह ग्रामीण भागात पक्ष संघटना अधिक मजबुत करण्यासाठी जोमाने प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
