Headlines

Global Maharashtra Breaking News

योगिनी एकादशीनिमित्त १० जुलै रोजी सद्गुरु मियांसाब यांचा 81 वा पुण्यतिथी उत्सव…

समाधीस्थानी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन… ⚡सावंतवाडी, ता.०८-:प. पू. श्री सद्गुरू मियांसाब यांच्या 81 व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी योगिनी एकादशीच्या पावन दिवशी समाधीस्थानी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सद्गुरूंचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले…

Read Full News

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोरील झाड कोसळले…

अनिल भिसे यांच्या स्टॉलचे नुकसान:मुसळधार पावसामुळे घटना; सुदैवाने जीवितहानी टळली. ⚡सावंतवाडी, ता. ८-:सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोरील अनिल भिसे यांच्या घरासमोर बुधवारी सकाळी अचानक झाड कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत सौ. भिसे यांचा व्यावसायिक स्टॉलचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे हे झाड अचानक उन्मळून पडल्याची प्राथमिक…

Read Full News

मतदारसंघातील वीज वितरणचा प्रश्न येता दोन दिवसात मार्गी लावा…

आमदार केसरकरांच अधिकाऱ्यांना निर्देश:अनुपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने बैठकीला बोलावले.. सावंतवाडी, ता. ७ : सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यांत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वीजपुरवठ्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. बैठकीच्या प्रारंभी अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख आणि कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे अनुपस्थित असल्याने…

Read Full News

शिष्यवृत्ती परीक्षेत मालवणच्या भंडारी ए. सो. हायस्कूलच्या नागेंद्र तारीचा जिल्हा गुणवत्ता यादीत ४७ वा क्रमांक…

⚡मालवण ता.०७-:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) २०२६ मध्ये भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या शाळेचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी नागेंद्र युवराज तारी याने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत ४७ वा क्रमांक मिळविला. तसेच रेणुका गुरुनाथ चव्हाण आणि रिया…

Read Full News

रोटरी क्लब मालवणच्या अध्यक्षपदी नीलम जोशी

मालवण (प्रतिनिधी) मालवण रोटरी क्लबची सन २०२६- २७ या वर्षासाठी नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी नीलम जोशी यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी प्रविणा शिंदे व खजिनदारपदी प्रदीप सामंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवीन पदाधिकारी व कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा डिस्ट्रिक्ट ३१७० चे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. अविनाश पोतदार यांच्या हस्ते व…

Read Full News

मालवणातील मोकाट गुरांच्या प्रश्नी ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा…

मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांना निवेदन सादर मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरात सध्या मोकाट गाई व गुरांमुळे अत्यंत गंभीर समस्या निर्माण झाली असून, यावर तात्काळ प्रतिबंधात्मक व दंडात्मक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेचे उपशहरप्रमुख किरण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांना लेखी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. शहरात फिरणाऱ्या या…

Read Full News

बाबी जोगी यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर नगर पालिका प्रशासनाला जाग…

देऊळवाडा- आंगणेवाडी मुख्य रस्त्यावरील कचऱ्याची केली स्वच्छता… मालवण, दि प्रतिनिधीठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी घेतलेल्या तीव्र आणि आक्रमक पवित्र्यामुळे अखेर मालवण नगरपालिका प्रशासनाला जाग आली आहे. देऊळवाडा, आडारी आणि आंगणेवाडी मुख्य रस्त्यावर पसरलेली डंपिंग ग्राउंडमधील घाण आज पालिका प्रशासनाने अग्निशमन बंबाच्या साहाय्याने पूर्णपणे धुवून स्वच्छ केली. प्रशासनाच्या या तातडीच्या कारवाईमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी…

Read Full News

कुडाळ तालुक्यातील गणनापत्र वाटपाची गती अपेक्षेपेक्षा कमी

निष्काळजीपणा करणाऱ्यांवर निलंबनाचा इशारा:SRI आणि शेतकरी ई-केवायसी मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून कुडाळात आढावा.. ⚡कुडाळ ता.०७-: भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६’ अंतर्गत मतदार यादी सुधारणा, गणनापत्र वाटप आणि संगणकीकरणाच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या संबंधित अधिकारी व बी.एल.ओ. (BLO) यांच्यावर थेट निलंबनाचा प्रस्ताव…

Read Full News

​निसर्गरम्य आंबोलीत २ ऑगस्टला ‘मान्सून मॅरेथॉन’चा थरार…

सह्याद्री ऍडव्हेंचर आणि सायकलिस्ट असोसिएशनचा पुढाकार:२१, १० आणि ५ किमी गटात होणार स्पर्धा.. ⚡​कुडाळ ता.०७-: सिंधुदुर्गचे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणाची सर्वानाच भुरळ पडते. पण काहीवेळा पर्यटनाचा अतिउत्साह जीवावर बेततो. दऱ्याखोऱ्यात, अपघातात माणसे जीव गमावून बसतात. मग त्यांच्यासाठी निरपेक्ष वृत्तीने धावून जातात ते बाबल आल्मेडा त्यांच्या सह्याद्री ऍडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुपचे धाडसी…

Read Full News

इन्सुली-धुरीवाडीत २१ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…

⚡बांद ता.०७-: इन्सुली-धुरीवाडी येथील केतन मनोहर गावकर (वय २१) याने राहत्या घरातील बाथरूममध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली.प्राथमिक माहितीनुसार, ही घटना आज सकाळी साडेअकरा ते दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान घडली असावी, असा अंदाज आहे. दुपारी केतन यांचे आजोबा सुभाष भीमसेन गावकर यांनी बाथरूममध्ये पाहणी केली असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत…

Read Full News

You cannot copy content of this page