Headlines

Global Maharashtra Breaking News

२० ते २५ दिवसांपासून फरार भारत लाखे पोलिसांना शरण…

उद्या न्यायालयात हजर करणार: पोलिसांची माहिती.. सावंतवाडी : नगरपरिषद पाणीपुरवठा विभागातील रजिस्टर गहाळ झाल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा असलेले पालिकेचे जोडारी भारत लाखे हे आज स्वतःहून सावंतवाडी पोलीस ठाण्यात हजर झालेत. पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे. गेले २० ते २५ दिवस फरार होते‌. सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागात १७ लाखांचा अपहार झाल्याचा आरोप झाल्यानंतर…

Read Full News

सावंतवाडीत अनधिकृत गाडे-टपऱ्यांवर नगरपालिकेची धडक कारवाई…

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून पालिकेच्या हद्दीत अनधिकृतपणे लावलेल्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम अधिक कडक करण्यात आली असून गाडे, टपऱ्या काढयासंदर्भात दोन-तीन वेळा सूचना केली होती. मात्र, दखल न घेतल्याने कारवाई करण्यात आल्याचे प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी सांगितले. आज दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. एसपीके कॉलेज समोरील भागातील रस्त्यावर लागलेले…

Read Full News

‘मत वाचवा, देश वाचवा’;

सावंतवाडीत काँग्रेसचे उद्या ‘लोकशाही वाचवा’ आंदोलन.. ⚡सावंतवाडी ता. ७-: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निषेधार्थ ‘मत वाचवा, देश वाचवा’ या घोषवाक्यासह ‘लोकशाही वाचवा सप्ताहा’ अंतर्गत निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.हे आंदोलन गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोर करण्यात येणार…

Read Full News

*भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘स्टार्टअप वर्कशॉप’…

महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे सीईओ डॉ. श्रीकांत पाटील यांची उपस्थिती.. ⚡सावंतवाडी ता.०७-: विद्यार्थ्यांच्या कल्पनांना नवोपक्रम, उद्योजकता आणि स्टार्टअपच्या माध्यमातून प्रत्यक्ष व्यावसायिक रूप देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील इनक्युबेशन सेंटर आणि महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टार्टअप वर्कशॉप’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे…

Read Full News

रुग्णाकडून पैसे घेतल्यास शिवसेना गप्प बसणार नाही – सुशांत नाईक

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसरात क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली सीटीस्कॅन सेवा शासनाच्या धोरणानुसार मोफत असताना गेल्या महिन्याभरात सुमारे ३०० रुग्णांकडून पैसे घेण्यात आल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला. मोफत सेवा असताना रुग्णांकडून पैसे का घेतले जात आहेत, असा सवाल करत यापुढे एकाही रुग्णाकडून पैसे घेतल्यास शिवसेना गप्प…

Read Full News

सावंतवाडीत शाळा नं.4 मध्ये अंगणवाडी सेविकांचा सन्मान…

सावंतवाडी शाळा नंबर चार मध्ये नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्या शुभहस्ते अंगणवाडी सेविकांचा सन्मान.. ⚡सावंतवाडी ता.०७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत सेवा सप्ताह च्या निमित्ताने एक विशेष कार्यक्रम म्हणून,”अंगण का उत्सव” हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता त्यात शाळा नंबर २चा कार्यक्रम 3 ऑक्टोंबर रोजी शाळा नंबर 4 चा…

Read Full News

जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत कुडाळ हायस्कूलचे वर्चस्व

मालवण (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, ओरोस येथे उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटांचा सहभाग होता. या स्पर्धेत विविध गटात कुडाळ हायस्कुलने वर्चस्व…

Read Full News

उबाठा शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य नोंदणीचा मालवणात शुभारंभ

मालवण (प्रतिनिधी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य नोंदणीचा शुभारंभ आज माजी आमदार, जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण शिवसेना शाखा येथे करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी वैभव नाईक यांनी केले. यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले,…

Read Full News

हळवल-भाकरवाडीचा कमी दाबाचा प्रश्न मार्गी…

स्वतंत्र ट्रान्सफार्मर मंजूर:पंचायत समिती सदस्य लक्ष्मण गावडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश,पालकमंत्री नितेश राणे व आमदार प्रमोद जठार यांचे ग्रामस्थांकडून आभार.. ⚡कणकवली ता.०७-: हळवल-भाकरवाडी परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याच्या समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. या परिसरासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर मंजूर करण्यात आला असून, त्यामुळे ग्रामस्थांना सुरळीत वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला…

Read Full News

‘यशस्वी जीवनाची दिशा स्वतः ठरवा; आवडीच्या क्षेत्रात कष्ट करा’…

दादा भुसे:मंत्री भुसे यांची बॅ नाथ पै सेंट्रल स्कुलला भेट.. ⚡कुडाळ ता.०७-: शिक्षक ज्ञानदानासोबत विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. मात्र, आयुष्यात कोणत्या दिशेने जायचे, हे विद्यार्थ्यांनी स्वतः ठरवायचे आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करून त्या दिशेने सातत्याने कष्ट केल्यास यशस्वी होता येते, असा संदेश राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी विद्यार्थ्यांना…

Read Full News

You cannot copy content of this page