Headlines

Global Maharashtra Breaking News

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयतर्फे ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान’ संपन्न

⚡मालवण ता.१०-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा एनएसएस विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, मालवण तसेच ग्रामपंचायत कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान राष्ट्रीय सेवा योजना दत्तक गाव असलेल्या कांदळगाव येथे संपन्न झाले. यावेळी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला तसेच वृक्षारोपण करण्यात आले. कांदळगाव ग्रामपंचायत हॉलमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर…

Read More

घुमडे घुमडाई मंदिर येथे श्रावणधारा व निमंत्रित भजनी मंडळांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

⚡मालवण ता.१०-: श्रावण मास निमित्ताने श्री देवी घुमडाई मंदिर घुमडे येथे उद्योजक दत्ता सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळ आयोजित गुरुवर्य कै. पंढरीनाथ घाडीगांवकर स्मरणार्थ निमंत्रित भजनी मंडळांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा ८ ते ११ सप्टेंबर तसेच श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी श्रावणधारा या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा कार्यक्रमांचे हे नववे वर्ष…

Read More

माजी सभापती शीतल राऊळ यांचे 15 ऑगस्टला ओरोसला उपोषण

भाजपची सत्ता असूनही बांद्यातील क्रीडा संकुलाचा प्रश्न सुटत नसल्याने उपोषण बांदा/प्रतिनिधीबांदा येथे क्रीडा संकुल व्हावे यासाठी गेली सहा वर्षे आपण झटत आहोत. तत्कालीन क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी क्रीडा संकुलाला मंजुरी देखील दिली होती तर तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बांदा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची असलेली तेरा एकर जागा क्रीडा विभागाला वर्ग करण्याचे…

Read More

मंदीर परिसरात सीसीटिव्ही बसवा…

सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हटकर यांचे आवाहन ओरोस ता.१०-: मंदिर परिसरात सीसीटिव्ही बसवा. पहारेकरी नेमा. फंड पेटी वेळोवेळी फोडून त्यातील रक्कम काढून घ्या, असे आवाहन सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीतील मंदिर मानकरी, ट्रस्टी यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनीष कोल्हटकर यांनी केले आहे.ओरोस सावंतवाडा येथील भवानी मंदिराची फंड पेटी अज्ञात चोरट्याने फोडली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी अधिक सतर्क…

Read More

सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्यावतीने वृक्षा रोपण

सिंधुदुर्गनगरी-:सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस ठाणे परिसरात वृक्षा रोपण कार्यक्रम राबविण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दळवी यांच्यासह पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस महिला, पुरुष कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे यांच्याहस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. यावेळी विनोद दळवी, बाळ खडपकर, दत्तप्रसाद…

Read More

सहकार विभागाच्या भरतीची लेखी परीक्षा १४, १६ ऑगस्ट रोजी

ओरोस ता.१०-:राज्य शासनाच्या सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळसेवेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील उमेदवारांची परीक्षा १४ व १६ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने सुकळवाड येथील मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट या परीक्षा केंद्रावर होणार आहे. टी सी एम या कंपनीद्वारे ही परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेसाठी…

Read More

हत्ती हटाव दोडामार्ग बचाव…

हत्ती बाधित ग्रामस्थांचे वनविभागासमोर आंदोलन ; मंत्री केसरकर यांच्या आश्वासनाअंती माघार, राजन तेलीचीही शिष्ठाई.. ⚡सावंतवाडी ता.१०-: हत्ती हटाव दोडामार्ग बचाव अशा आक्रमक घोषणा देत दोडामार्ग तालुक्यातील हत्ती बाधित गावातील संतप्त ग्रामस्थांनी आज येथील वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. जोपर्यंत हत्ती हटावाबाबत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशीच भूमिका ग्रामस्थांनी घेत तब्बल सहा तास…

Read More

सह्याद्री फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मान्सून महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡सावंतवाडी ता१०-: येथील सह्याद्री फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मान्सून महोत्सवा मध्ये रानभाज्या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद लाभा असून यावेळी 36 स्पर्धकांनी भाग घेतला होता कुडाळ सावंतवाडी आंबोली वेंगुर्ले दोडामार्ग आदी भागातून रानभाज्या चे स्टॉल वापरण्यात आले होते.  कणकीच्या कोंबा चे कटलेट या रान भाजीला वैशाली मिसाळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय क्रमांक फागल्याचे मोदक…

Read More

मतदान हे पवित्र कार्य आहे-नायब तहसीलदार नागेश शिंदे

आचरा हायस्कूल येथे मतदान नोंदणी व जनजागृती शिबीर संपन्न.. ⚡मालवण ता.१०-: मतदान हे पवित्र कार्य आहे. प्रत्येक मतदाराने तो बजावावा असे मत मालवण तालुका निवडणूक नायब तहसिलदार नागेश शिंदे यांनी आचरा येथे व्यक्त केले. न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काढूशे आणि मालवण तहसीलदार श्रीमती वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठीनवमतदार नोंदणी आणि…

Read More

पणदूर येथील उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

⚡कुडाळ ता.१०-: सिंधुदुर्गात भाजप पक्षात जोरदारइनकमिंग सुरू आहे. आज पणदूर येथील उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते निलेश राणे यांच्या विशेष उपस्थितीत रत्नदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये ओमकार सावंत, शुभम सावंत, समीर सावंत, आशिष परब, दिनेश वंजारे, अशोक गुरव, वैभव साळुंखे, अजय साळुंखे, पपू दळवी, श्रीराम मेस्त्री, रोहिदास पालव, अनिकेत राऊळ, सागर पालव,…

Read More
You cannot copy content of this page