माझ्या क्रिकेटची सुरुवात सावंतवाडीतून…

सचिन तेंडुलकर : मुंबईत दिला सावंतवाडीतील आठवणींना उजळला..

सावंतवाडी ता.०३-: एखादा सामन्यात परफॉर्मन्स करताना बुद्धिमत्ता आणि कौशल्य फार महत्त्वाचे आहे. मला आठवते की आचरेकर सर यांनी मला घडवले. तसेच सावंतवाडीत विनोद कांबळी असे अनेक खेळाडू घडवले. माझ्याही क्रिकेट प्रवासाची सुरुवात सावंतवाडी ते वानखेडे स्टेडियम अशी झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही असे, उदगार क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकर यांनी काढले.मुंबईत एका क्रिकेट कार्यक्रमा निमित्त तेंडुलकर बोलत होता.

यावेळी त्यांनी सावंतवाडीतील आठवणींना उजळला दिला. तेंडुलकर म्हणाले की, आज मला आठवण येते सावंतवाडीच्या दौऱ्याची तर आम्ही सगळे मित्र एकत्र बसून जुन्या आठवणींना उजाळा देतो. अनेक वेळा वेगवेगळे गोष्टी झाले आहेत. त्या गोष्टी तुमच्या बरोबर सदैव राहतात. माझी इच्छा आहे की,वेगवेगळी व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा अनेक गोष्टी दुसऱ्यांकडून शिकायला मिळतात. असे सांगत सचिन तेंडुलकर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page