Headlines

Global Maharashtra Breaking News

आंबोली क्रिकेट स्पर्धेत तुळस येथील संघ विजेता…

उद्धव ठाकरे शिवसेनेचे आयोजन:, आंबोली गावठण संघ उपविजेता.. आंबोली,ता.७ : शिवसेना (उद्धव ठाकरे) पुरस्कृत आंबोली येथील क्रिकेट स्पर्धेत तुळस(ता.वेंगुर्ला) संघ विजेता तर गावठण (आंबोली) संघ उपविजेता ठरला. आंबोली कामतवाडी येथील मैदान येथे शिवसेना(उद्धव ठाकरे)पक्षाकडून तीन दिवस क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली. २१,०२४ प्रथम पारितोषिक आणि द्वितीय ११,०२४ तृतीय ३०२४ रक्कम आणि चषक ठेवण्यात आले होते. यात…

Read Full News

भंडारी समाजाने आपली एकजूट घट्ट ठेवावी…

नवीनचंद्र बांदिवडेकर:भंडारी समाज मंडळातर्फे आयोजित वधू वर सूचक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡सावंतवाडी ता.०७-: कष्ट, जिद्द व प्रामाणिकणाचे दुसरे नाव म्हणजे भंडारी समाज. भंडारी समाज हा लढवय्या समाज आहे. भंडारी समाजाने आपली एकजूट घट्ट ठेवावी. मायनक भंडारी, भागोजी शेठ कीर ही समाजाची अस्मिता आहे. लग्न जमवताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लग्न जमवतानही तडजोड करायला शिका. प्रत्येकाने समाजाची…

Read Full News

आजचा क्षण माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण…

उद्योजिका सौ. वेदिका परब: मिलाग्रीस हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.. ⚡सावंतवाडी ता.०७-: ज्या शाळेत शिकलो आणि ज्या शाळेने मोठं केलं त्याच शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना बक्षीस देताना आपल्याला फार आनंद होत आहे.त्यांचा गौरव करताना मला माझ्य शालेय जीवनातील दिवस आजही आठवत आहेत.आजचा हा क्षण माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण आहे. याशिवाय दुसरा कुठलाच आनंदाचा क्षण…

Read Full News

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा शिक्षण विभागाने प्रस्ताव मंजूर केला असल्यास आपण पाठपुरावा करू…

राज्य शिक्षकेत्तर कर्मचारी अधिवेशनात शिक्षणमंत्री केसरकर यांची ग्वाही सावंतवाडी,दि.७ जानेवारी (प्रतिनिधी)उच्च माध्यमिक शिक्षण विभागातील शिपाई भरतीला स्थगिती आहे. परंतु शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अर्थ विभागाने प्रस्ताव मंजूर केला असेल तर मी अर्थ विभागाकडे जाऊन शिक्षकेतर १०/२०/३० आणि २४ च्या प्रस्ताव मंजूरीसाठी पाठपुरावा करेन अशी ग्वाही शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी दिली. महाराष्ट्र राज्य…

Read Full News

मुंबई विद्यापीठ कोकण विभाग क्रिकेट स्पर्धा श्री पंचम खेमराज महाविद्यालय संघ विजयी…

⚡सावंतवाडी ता.०७-: मुंबई विद्यापीठ कोकण विभाग ( रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा) आंतर महाविद्यालयीन क्रिकेटस्पर्धा 2023-24 कोकण विभाग क्रीडा समिती व स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण यांनी दिनांक 17/ 12/ 2023 ते 5/1 / 2024 रोजी बोर्डिंग मैदान मालवण व सावंतवाडी नगर परिषद क्रिकेट मैदान येथे आयोजित केली होती.नगरपरिषद सावंतवाडी मैदान येथे दिनांक 5/1 / 2024 रोजी…

Read Full News

युवतीसेनेतर्फे फ्लॉवर ज्वेलरी व केसांच्या सजावटीचे साहित्य बनविण्याचे शिबीर…

⚡मालवण ता.०७-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी युवतीसेने तर्फे आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी व हस्तनिर्मित केसांच्या सजावटीचे साहित्य बनविण्याचे मोफत प्रशिक्षण दि. ८ जानेवारी रोजी सायंकाळी ३ ते ६ या वेळेत मालवण धुरीवाडा येथील साई मंदिर नजीक रश्मी परुळेकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये मुली व महिलांनी सहभागी व्हावे, तसेच इच्छुकांनी अधिक…

Read Full News

बंजारा समाजासाठी प्रगतीचा रस्ता भाजप दाखवेल…

केंद्रीय मंत्री नारायण राणे: गोर बंजारा समाजातील नागरिकांचा भाजप प्रवेश … ⚡कुडाळ ता.०७-: बंजारा समाजासाठी प्रगतीचा रस्ता भाजप दाखवेल, असे प्रतिपादन रविवारी कुडाळ येथे पार पडलेल्या गोर बंजारा समाजातील नागरिकांच्या भाजप पक्षप्रवेशावेळी भाजप जेष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.कुडाळ येथे रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो गोर बंजारा समाजातील नागरिकांचा भाजप प्रवेश आयोजित केला…

Read Full News

राष्ट्रहित व देशनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य द्या…

आत्माराम गावडे:अणसूर पाल हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.. ⚡वेंगुर्ला ता.०७-: विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर यशाची शिखरे सर करताना, राष्ट्रहित व देशनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन अणसूर पाल हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी संस्थाध्यक्ष आत्माराम गावडे यांनी केले. अणसूर पाल हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शाळेच्या बहुद्देशीय सभागृहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे दादासाहेब…

Read Full News

कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १५ मध्ये १० जानेवारी रोजी आयुष्यमान भारत कार्ड योजनेसाठी नोंदणी शिबिर…

कुडाळ ता.०७-: कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १५ मध्ये बुधवार, १० जानेवारी २०२४ रोजी आयुष्यमान भारत कार्ड योजनेसाठी नोंदणी शिबिर आयोजित केले आहे. हे नोंदणी शिबिर बीएलओ श्रुती कुंभार (मधली कुंभारवाडी) यांच्या निवासस्थानी सकाळी १० ते दुपारी २ वाजल्यापर्यंत सुरू राहील. ज्या नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेची नोंदणी करायची असेल त्यांनी रेशनकार्ड (केसरी आणि पिवळे शिधाधारक), आधारकार्ड…

Read Full News

स्पर्धा परीक्षा तयारीसाठी नगर वाचन मंदिरतर्फे ई – लायब्ररी…

⚡मालवण ता.०७-: स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मालवण येथील नगर वाचन मंदिरने स्व. वसंतराव डावखरे स्पर्धा परीक्षा केंद्रांतर्गत ई लायब्ररीची सेवा उपलब्ध करून दिली आहे. या ई- लायब्ररीमध्ये इंटरनेट सेवा, स्पर्धा परीक्षेची सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध होणार आहेत. मालवण तालुका व शहरातील ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे, त्यांनी या ई-लायब्ररीचा लाभ घ्यावा, अधिक…

Read Full News

You cannot copy content of this page