कुडाळ ता.०७-: कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १५ मध्ये बुधवार, १० जानेवारी २०२४ रोजी आयुष्यमान भारत कार्ड योजनेसाठी नोंदणी शिबिर आयोजित केले आहे. हे नोंदणी शिबिर बीएलओ श्रुती कुंभार (मधली कुंभारवाडी) यांच्या निवासस्थानी सकाळी १० ते दुपारी २ वाजल्यापर्यंत सुरू राहील.
ज्या नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेची नोंदणी करायची असेल त्यांनी रेशनकार्ड (केसरी आणि पिवळे शिधाधारक), आधारकार्ड आणि आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल घेऊन येणे आवश्यक आहे. या नोंदणी शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वॉर्ड क्र. १५ चे नगरसेवक उदय मांजरेकर यांनी केले आहे.
