⚡मालवण ता.०७-: स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मालवण येथील नगर वाचन मंदिरने स्व. वसंतराव डावखरे स्पर्धा परीक्षा केंद्रांतर्गत ई लायब्ररीची सेवा उपलब्ध करून दिली आहे. या ई- लायब्ररीमध्ये इंटरनेट सेवा, स्पर्धा परीक्षेची सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध होणार आहेत.
मालवण तालुका व शहरातील ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे, त्यांनी या ई-लायब्ररीचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी संजय शिंदे – ९४२२२३४९५० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नगर वाचन मंदिरतर्फे करण्यात आले आहे.
