उद्धव ठाकरे शिवसेनेचे आयोजन:, आंबोली गावठण संघ उपविजेता..
आंबोली,ता.७ : शिवसेना (उद्धव ठाकरे) पुरस्कृत आंबोली येथील क्रिकेट स्पर्धेत तुळस(ता.वेंगुर्ला) संघ विजेता तर गावठण (आंबोली) संघ उपविजेता ठरला. आंबोली कामतवाडी येथील मैदान येथे शिवसेना(उद्धव ठाकरे)पक्षाकडून तीन दिवस क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली.
२१,०२४ प्रथम पारितोषिक आणि द्वितीय ११,०२४ तृतीय ३०२४ रक्कम आणि चषक ठेवण्यात आले होते. यात एम.एस.आर.टी.तुळस संघ विजेता ठरला.शिवसेना उपजिल्हा प्रमुख शब्बीर मणियार,जिल्हा निरीक्षक अशोक परब,तालुका उपसंघटक उत्तम पारधी,विभाग प्रमुख बबन गावडे,विनोद ठाकूर उपविभाग प्रमुख,प्रशांत बुगडे विभागप्रमुख तळवडे,संतोष पाताडे, ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत,प्रकाश गुरव,शाखा प्रमुख नारायण कोरगावकर,चौकुळ शाखा प्रमुख रुपेश गावडे,अनिल चव्हाण, सुनील राऊत,बाबुराव गावडे,कांता राऊत,तानाजी गावडे,लक्ष्मण गावडे,महेश गावडे,मनोज गावडे,दादा नाटलेकर,रूपा गावडे, विनायक गावडे,तानाजी गावडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.द्वितीय पारितोषिक हिरण्यकेशी क्रिकेट क्लब गावठण संघ आंबोली उपविजेते ठरले. तृतीय पारितोषिक श्रद्धा गणेश संघ कामतवाडी याना देण्यात आले.मालिकावीर गेळे फायटर्स नवनाथ गवस याना अनिल चव्हाण यांच्या हस्ते चषक आणि रोख रक्कम देण्यात आले.उत्कृष्ट गोलंदाज गावठण संघ मनोज पेंडसे याना संतोष पाताडे यांच्या हस्ते चषक आणि रोख रक्कम देण्यात आली.यासाठी विभाग प्रमुख बबन गावडे यांनी रोख एक हजार चे पारितोषिक त्यांच्या हस्ते देण्यात आले.उत्कृष्ट फलंदाज तुळस संघाचे संकेत तुळसकर याना रूपा गावडे यांच्या हस्ते चषक आणि रोख रक्कम देण्यात आली.
