शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा शिक्षण विभागाने प्रस्ताव मंजूर केला असल्यास आपण पाठपुरावा करू…

राज्य शिक्षकेत्तर कर्मचारी अधिवेशनात शिक्षणमंत्री केसरकर यांची ग्वाही

सावंतवाडी,दि.७ जानेवारी (प्रतिनिधी)
उच्च माध्यमिक शिक्षण विभागातील शिपाई भरतीला स्थगिती आहे. परंतु शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अर्थ विभागाने प्रस्ताव मंजूर केला असेल तर मी अर्थ विभागाकडे जाऊन शिक्षकेतर १०/२०/३० आणि २४ च्या प्रस्ताव मंजूरीसाठी पाठपुरावा करेन अशी ग्वाही शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाच्या ५१ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर बोलत होते. यावेळी अध्यक्ष शिवाजीराव खांडेकर, अध्यक्ष अनिल माने, जिल्हाध्यक्ष अनिल राणे, गजानन नानचे, उपाध्यक्ष सुहास देसाई, वैभव केंकरे, व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिवाजीराव खांडेकर यांनी प्रास्ताविक करताना १०/२०/३० आणि २४ चा योजना लाभ द्यावा असे सांगून संघटनेची भूमिका मांडली. शिवसेना मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना बारा वर्षांचा लाभ मिळाला. त्यामुळे आता आपल्याकडून मिळावा, अशी विनंती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना केली.
यावेळी पुढे बोलताना मंत्री केसरकर यांनी, शासनाचा दृष्टीकोन साकारात्मक राहीला आहे. आम्ही कायम न्याय देण्यासाठी प्रयत्न केला. उच्च माध्यमिक योजना मान्य केले असेल तर अर्थ विभागाकडे जाऊन २४ चा लाभ मिळवून देण्यासाठी मुंबईत गेल्यावर प्रयत्न करेन. शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला पाहिजे म्हणून न्यायालयात विनंती केली आहे. पहिल्या टप्प्यातील तीस हजार तर दुसऱ्या टप्प्यात २० हजार मिळून ५० हजार शिक्षक भरती प्रक्रियेला प्राधान्य दिले आहे. शालेय शिक्षण व खाजगी शिक्षण विभाग समन्वय पाहिजे. केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या योजना कवच मिळाले पाहिजे, असे सांगतानाच त्यांनी विदेशी इंग्लिश, स्काऊट गाईड शिक्षण देताना विविध देशांतील भाषांत शिक्षण दिले पाहिजे. भारतीय संस्कृतीत मनुष्यबळ आहे. जगातील सर्वच देश भारतीय मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे जर्मन मध्ये शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मुंबईत कौशल्य विकासाचे स्वप्न व प्रात्यक्षिके शिक्षणविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत, असे सांगितले.

You cannot copy content of this page