सीएससी केंद्रांच्या निष्काळजीपणामुळे २२०० शेतकरी आंबा-काजू पीक विम्यापासून वंचित
माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदाच्या आंबा आणि काजू फळपीक विम्याची रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असली, तरी सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) केंद्रांच्या कथित गलथान कारभारामुळे जिल्ह्यातील सुमारे २,२०० शेतकरी अद्याप विमा रकमेपासून वंचित असल्याचे उघड झाले आहे. या शेतकऱ्यांची सुमारे चार ते साडेचार कोटी रुपयांची विमा…
