म्हाडा वसाहतीमध्ये न.प.तर्फे ‘संपूर्ण स्वच्छता मोहिम‘…
⚡वेंगुर्ला ता.१७-: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या हस्ते ‘संपूर्ण स्वच्छता मोहिम‘ राबविण्यात आली. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाकडून ही स्वच्छता मोहिम राज्यभर विस्तारीत करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून १७ जानेवारी रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहरातील म्हाडा वसाहत परिसरामध्ये ‘संपूर्ण स्वच्छता मोहिम‘ राबविण्यात आली.
