Headlines

Global Maharashtra Breaking News

भीमराव पांचाळे यांनी दिले गझल लेखन व गायनाचे धडे…

गजल सागर प्रतिष्ठान व अखंड लोकमंचतर्फे कणकवलीत कार्यशाळेचे आयोजन.. ⚡कणकवली ता.२३-: गजल सागर प्रतिष्ठान मुंबई व अखंड लोकमंच कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली येथील नगरवाचनालय सभागृहामध्ये नुकतीच गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवशीय गझल लेखन व गायन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला महाराष्ट्र व गोव्यातून विविध गजल लेखक व गजल आवड असणार्‍या श्रोत्यांनी…

Read Full News

अवकाळी मुसळधार पावसाने मालवणवासीयांना झोडपले…

वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांच्या छपरांची पडझड:नागरिकांची उडाली धावपळ.. ⚡मालवण ता.२२-: आज सायंकाळी आलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने मालवणवासीयांना अक्षरशः झोडपून काढले . जोरदार पर्जन्यवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांच्या छपरांची पडझड झाली असून झाडे वीज पोल यांचेही मोठे नुकसान झाले आहे. विजेच्या लखलखटामुळे घरगुती विजेची साहित्य, इन्व्हर्टर, जनरेटर यांची मोठी नुकसानी झाली असून या वादळी पावसाने…

Read Full News

हरकुळ बु. येथील कार-दुचाकी अपघातात तिघे जखमी…

⚡कणकवली ता.२२-: कारची दुचाकीला समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वारसह तिघे किरकोळ जखमी झाले. हा अपघात कणकवली-कनेडी मार्गावरील हरकुळ बु. येथील भाटदुकान नजीक मंगळवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी कारचालक अजय रामचंद्र मालवणकर (28, रा. मालवण) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मोहसिन नूर मोहमंद शेख (34, रा. हरकुळ बु. शेखवाडी) हे आपल्या दुचाकीवरून…

Read Full News

पाणीटंचाईची झळ बसू नये म्हणून यंत्रणांनी दक्षता घ्यावी…

आमदार नीतेश राणेंची सूचना ः जलजीवन, जिल्हा नियोजनच्या विविध कामांचा घेतला आढावा.. ⚡ओरोस ता.२२-: जिल्हा वार्षिक योजनेतील ग्रामीण भागातील विविध विकास कामाला चालला देण्यासाठी व विजयदुर्ग नळपाणी योजनेच्या नादुरुस्तीमुळे त्या भागातील निर्माण झालेला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या समवेत बैठक घेत विविध प्रश्न सोडविण्याच्या…

Read Full News

जानवलीतील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा…

आमदार नीतेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. ⚡कणकवली ता.२२-: जानवली येथे सातत्याने होणारे अपघात महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे होत आहे. या अपघातात निरपराधांचे बळी जात आहेत. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीने उपाययोजना कराव्यात. वाहनांचा स्पीड नियंत्रित रहावा यासाठी गतिरोधक आणि माहिती फलक ठिकठिकाणी लावावेत, अशा सूचना आमदार नीतेश राणे यांनी अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या….

Read Full News

पुन्हा अपघात झाल्यास हायवे बंद करू…

जानवली ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला इशारा… ⚡कणकवली ता.२२-: मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली येथे झालेल्या अपघातांमध्ये मृत झालेल्या कुटुंबीयांना राष्ट्रीय महामार्ग व ठेकेदाराने नुकसान भरपाई द्यावी व महामार्गबाबतच्या 16 समस्यांबाबत जानवली ग्रामस्थ अाक्रमक झाले. यापुढील काळात जानवली येथे अपघात झाला तर हायवे बंद करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावर महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव व उपअभियंता…

Read Full News

सिंधुदुर्गनगरीत वीज, पाऊस आणि वाऱ्याचे तांडव…

वीज गायब तर रस्त्यात झाडे पडल्याने वाहतूक ठप्प.. ओरोस ता २२बुधवारी संध्याकाळी सवा पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सिंधुदुर्गनगरीत मोठ्या प्रमाणात झाडे मोडून आणि मुळासकट रस्त्यावर कोसळल्याने येथील वाहतूक बंद झाली होती. तसेच ओरोस फाटा येथील दुकानांचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने झाडे रस्त्यावर कोसळली त्यावेळी वाहने किंवा माणसे…

Read Full News

वीज कोसळून गाय गतप्राण…

वेताळ बांबर्डे – देऊळवाडी येथील घटना:कुडाळ तालुक्यात बुधवारी जोरदार मेघगर्जना पडला पाऊस.. ⚡कुडाळ ता.२२-: कुडाळ तालुक्यात बुधवारी संध्याकाळी जोरदार मेघगर्जनेसह झालेल्या मुसळधार पावसात वीज पडून गाय मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. वेताळ बांबर्डे – देऊळवाडी येथील राहणारे गुणेश बांबर्डेकर यांची गाय झाडाखाली बांधून ठेवण्यात आली होती. बुधवारी संध्याकाळी ४ पासून विजांच्या जोरदार कडकडाटासह पाऊस सुरू झाला….

Read Full News

मुसळधार कोसळलेल्या पावसाने बांदा शहरात हाहाकार…

झाडे उन्मळून पडल्याने लाखो रुपयांची हानी:भाजपचे पदाधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या घरावर पिंपळाचे झाड कोसळल्याने मोठे नुकसान… ⚡बांदा ता.२२-: वादळी वाऱ्यासह मुसळधार कोसळलेल्या पावसाने बांदा शहरात आज हाहाकार माजवीला. शहरात ठिकठिकाणी वीज वाहक तारांवर झाडे उन्मळून पडल्याने लाखो रुपयांची हानी झाली. शहरातील गाडगेवाडी येथील भाजपचे पदाधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या घरावर पिंपळाचे झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले….

Read Full News

सोनुर्ली माऊली मंदिरात 23 रोजी विविध कार्यक्रम…

परब कुंटूबियांचे आयोजन ; लाभ घेण्याचे आवाहन.. सावंतवाडी ता.२२-:सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ…

Read Full News

You cannot copy content of this page