हरकुळ बु. येथील कार-दुचाकी अपघातात तिघे जखमी…

⚡कणकवली ता.२२-: कारची दुचाकीला समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वारसह तिघे किरकोळ जखमी झाले. हा अपघात कणकवली-कनेडी मार्गावरील हरकुळ बु. येथील भाटदुकान नजीक मंगळवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी कारचालक अजय रामचंद्र मालवणकर (28, रा. मालवण) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


मोहसिन नूर मोहमंद शेख (34, रा. हरकुळ बु. शेखवाडी) हे आपल्या दुचाकीवरून (एम एम 07 आय 4811) दोन मित्रांना घेऊन कणकवलीहून हरकुळ बु. दिशेने जात होते, तर अजय मालवणकर हे कार (एम. एच. 07 क्यू 7281) घेऊन कनेडीहून कणकवलीच्या दिशेने येत होते. भाटदुकान येथे अजय मालवणकर आले असता त्याने समोरील येणार्‍या दुचाकीला धडक दिली. या धडकेत तिघे जण किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी मोहसिन शेख यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अजय याच्या विरोधात भादंवि कलम 279, 337, 336, महाराष्ट्र मोटार अ‍ॅक्ट कायदा 84 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत तपास मिलिंद देसाई करीत आहेत.

You cannot copy content of this page