आमदार नीतेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना.
⚡कणकवली ता.२२-: जानवली येथे सातत्याने होणारे अपघात महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे होत आहे. या अपघातात निरपराधांचे बळी जात आहेत. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीने उपाययोजना कराव्यात. वाहनांचा स्पीड नियंत्रित रहावा यासाठी गतिरोधक आणि माहिती फलक ठिकठिकाणी लावावेत, अशा सूचना आमदार नीतेश राणे यांनी अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या.
ओम गणेश निवासस्थानी नीतेश राणे यांनी महामार्ग वरील समस्या, होणारे अपघात आणि अपूर्ण असलेली कामे याविषयी बैठक घेतली. या बैठकीला महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अतुल शिवनिवार, के. के. सी. बील्डकॉन कंपनीचे श्री. पांडे, गगनबावडा घटाचे कंत्राटदार श्री वेल्हाळ, भाजपचे पदाधिकारी बाळा जठार, दिलीप तळेकर, भालचंद्र साठे ,खारेपाटण सरपंच प्राची ईस्वलकर, संकेत शेट्ये. तळरे सरपंच, शिवसेनेचे बबन शिंदे, दामू सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई गोवा महामार्गवर अपघात होता नये, लोकांचे जीव जाता नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना करा. वर्दळीच्या ठिकाणी वाहनाची गती नियंत्रित राहील अशा पद्धतीने महामार्गावर उपयोजना केल्या जाव्यात अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी त्याचप्रमाणे ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी वैभववाडी गगनबावडा घाटातचे काम एक जूनपर्यंत पूर्ण करा. घाट मार्ग पूर्ण करण्यासाठी दिलेली डेटलाईट लाईन काम झाले पाहिजे, कोणतीच कारणे कंत्राटदाराकडून एेकूण घेणार नाही, असे राणे सुनावले.
