वीज कोसळून गाय गतप्राण…

वेताळ बांबर्डे – देऊळवाडी येथील घटना:कुडाळ तालुक्यात बुधवारी जोरदार मेघगर्जना पडला पाऊस..

⚡कुडाळ ता.२२-: कुडाळ तालुक्यात बुधवारी संध्याकाळी जोरदार मेघगर्जनेसह झालेल्या मुसळधार पावसात वीज पडून गाय मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. वेताळ बांबर्डे – देऊळवाडी येथील राहणारे गुणेश बांबर्डेकर यांची गाय झाडाखाली बांधून ठेवण्यात आली होती.

बुधवारी संध्याकाळी ४ पासून विजांच्या जोरदार कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यावेळी अचानक जोरदार वीज गाईवर कोसळली. यात गाईचा जागीच मृत्यू झाला. सदर गाय अडीच वर्षे वयाची होती.

You cannot copy content of this page