मानसीश्वर जत्रौत्सव १७ रोजी…
⚡वेंगुर्ला ता.१६-: उभादांडा येथील प्रसिद्ध श्री मानसीश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव शनिवार दि.१७ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे.
⚡वेंगुर्ला ता.१६-: उभादांडा येथील प्रसिद्ध श्री मानसीश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव शनिवार दि.१७ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे.
⚡बांदा ता.१६-: रोणापाल – आरोसकर टेंब येथील विश्राम गोविंद पालव (३०) या तरुणाने राहत्या घराच्या वाशाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. बांदा पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अर्चना फाऊंडेशनच्यावतीने १८ ते २० फेब्रुवारी कालावधीत आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१६-: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या संकल्पनेतून अर्चना फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगभरातील अस्सल दुर्मिळ चित्रांच्या प्रतिकृती आणि ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे सिंधुदुर्गवासीयांना पाहण्यासाठी १८ ते २० फेब्रुवारी कालावधीत आयोजित केले आहे.हे प्रदर्शन रोज…
⚡बांदा ता.१६-: पाडलोस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं 1 मध्ये तिन्ही शाळातील मुलांच्या पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पहिली ते चौथी गटातील वर्गवार पहिल्या तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते श्री. सुधीर गावडे यांनी रोख रक्कम स्वरूपात पारितोषिक वितरित केले. यावेळी तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
अर्चना घारे यांचे सौजन्य: शहरातील महिलांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन.. सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी शरद पवार गटाच्या वतीने आज सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत येथील मीना ग्रुप हायस्कूल जवळील अर्चना घारे परम यांच्या संपर्क कार्यालयात हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम राष्ट्रवादी सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांच्या सौजन्याने आयोजित केला…
१९ फेब्रुवारी रोजी प्रवीण भाई मित्रमंडळाने केले आहे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१६-: राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रवीण भाई भोसले यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त प्रवीण भाई मित्र मंडळाच्या वतीने सर्वपक्षीयांच्या उपस्थितीत 19 फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता आर पी डी येथील हॉलमध्ये वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती प्रवीणभाई मित्र मंडळाच्या वतीने आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात…
युवराज लखमराजे भोंसले:विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग करिअरच्या विविध संधी मिळवण्यासाठी करावा.. ⚡सावंतवाडी ता.१६-: श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागामार्फत केमोत्सव 2024 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते झाले.उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आणि मुंबई विद्यापीठ सिनेट…
सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान:आग विजविताना तरुण जखमी.. ⚡मालवण ता.१५-:मालवण तालुक्यातील देवबाग डिंगेवाडी येथील रामचंद्र मधुसूदन सामंत यांच्या घराला आज भल्या पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले या आगीत घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, तांबा, पितळीची भांडी, धान्य, कपडेलत्ते आणि इतर चिज वस्तू आगीत जळून भस्मसात झाल्याने…
⚡देवगड ता.१५-: पडेल कँन्टींग येथील व्यापारी रिक्षा- रिक्षा टेम्पो वर्धापन दिनानिमित्त आयोजित ऑकेष्ट्रा स्टार कोल्हापूर गीतांच्या गायन कार्यक्रमांमध्ये तानाजी कोराने यांनी अनेक गीते गायन करुन रसिक श्रोत्यांची मने जिंकलीपडेल कँन्टींग येथे व्यापारी रिक्षा- रिक्षा टेम्पो वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायणाची महापूजा व विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऑकेष्ट्रा स्टार कोल्हापुर या गीत…
विद्यार्थ्यांनी घेतले आपत्तीकाळात बचावाचे धडे.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१५-: कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 03 येथे विद्यार्थ्यांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व नागरी संरक्षण दल, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात शालेय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन विषयक विविध प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली तसेच आपत्काळात बचावाच्या विविध पद्धतींबाबत देखील प्रात्यक्षिकामधून…