तालुक्यातील ३१ शाळांचा निकाल १०० टक्के..
⚡मालवण ता.२७-:
कोकण बोर्डाच्या वतीने फेब्रुवारी मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा (दहावी) मालवण तालुक्याचा निकाल ९९.३९ टक्के लागला असून तालुक्यात दहावीच्या परीक्षेस बसलेल्या ९९० विद्यार्थ्यांपैकी ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या परीक्षेत मालवण तालुक्यातून ९९० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ४४९ जणांनी विशेष श्रेणी प्राप्त केली आहे. तर ३८९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १२३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २३ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील ३५ पैकी ३१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
मालवणच्या अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल प्रशालेचा कैवल्य सागर मिसाळ ९९.४० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आला असून कट्टा येथील वराडकर हायस्कूलचा देवदत्त गावडे ९८.४० टक्के गुण मिळवून द्वितीय आला आहे तर टोपीवाला हायस्कूलचा दीप कोकरे हा ९७.६० टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे.
1 फोटो : कैवल्य मिसाळ
2 फोटो : देवदत्त गावडे
3 फोटो : दीप कोकरे
