वीज वाहिनी पडून विद्या यांचा झाला होता दुर्दैवी मृत्यू..
बांदा ता.२७-:
कपडे धुण्यासाठी बांदा कुंभारदेवणे येथे गेलेल्या विद्या वामन बिले यांच्या नातेवाईकांना ग्रामस्थांच्या मागणी नुसार विजवीतरणने रोख रक्कम दोन लाखाची मदत सुपूर्द केली. सदरची रक्कम रविवारी रात्री देण्यात आली यावेळी विजवीतरणचे बांदा अभियंता तसेच बांदा ग्रामस्थ उपस्थित होते.
रविवारी सकाळी बांदा येथे ओहळात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर अचानक पोल कलंडल्याने वीज भारित लाईन पडल्याने तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता मात्र सुदैवाने ती लाइन पाण्यात न पडल्याने अन्य सहा महिलांना कोणतीही दुखापत झाली नव्हती. मात्र घटनेनंतर बांदा ग्रामस्थ आक्रमक झाले होते त्यांनी सदर महिलेच्या नातेवाईकांना रोख रक्कम मदत करण्याची मागणी केली होती. मात्र याबाबत विजवीतरणने नकार दिला होता मात्र ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात न घेता सदरचा मृतदेह वीज वितरणच्या कार्यालयात घेऊन जाण्याचा इशारा देताच तब्बल अडीच तासानंतर रोख रक्कम देण्याचे मान्य केले त्यानुसार रात्री उशिरा विजवीतरण चे अधिकारी बांदा येथील बिले कुटुंबियांच्या घरी जात त्यांची भेट घेत रोख रक्कम दोन लाख सुपूर्द केले.
यावेळी बांदा ग्रामस्थ उपस्थित होते
