⚡कणकवली ता.२८-: कलमठ-लांजेवाडी येथील प्रशांत दयानंद पाष्टे (27) याने आपल्या दुकानातील लोखंडी अॅगलला गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. मात्र, प्रशांत याचा आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही.
प्रशांत हा सोमवारी रात्री आपल्या दुकानात नेहमीप्रमाणे झोपायला गेला होता. त्यानंतर त्याने दुकानातील लोखंडी अॅगलला गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह लोखंडी अॅगलवर लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. याबाबत त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. प्रशांत याच्या आत्महत्येची घटना समजताच सरपंच संदीप मेस्त्री, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशांत याला व्यायामाची आवड होती. तो शरीरसौष्ठव स्पर्धेतही सहभागी व्हायचा. प्रशांत याच्या पश्चात आई, वडील, आजी, बहीण, भाऊ असा परिवार आहे.
कलमठ-लांजेवाडी येथील युवकाची गळफास घेत आत्महत्या…
