सरमळे वासियांनी एका रात्रीत मंदिर उभारून पांडवकारी इतिहासाची पुनरावृत्ती केली…
मंत्री दिपक केसरकर:ग्रामस्थांच्या एकजुटीचे केले कौतुक.. ⚡सावंतवाडी ता.१०-: सरमळेवासियांनी भाविकांच्या सहकार्याने पांडवकालीन सपतनाथ मंदिर एका रात्रीत बांधून पांडवकालीन इतिहासाची पुनरावृत्ती केली. त्यामुळे भाविकांचे अनेक वर्षांपासूनचे एका रात्रीत मंदिर बांधण्याचे स्वप्न साकार झाले असून यातून सरमळेवासियांची एकजूट दिसून आली. असे प्रतिपादन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले.
