मोंड कॉलेज ते गावठणकडे जाणाऱ्या रस्त्याची आमदार नितेश राणे यांनी केली पाहणी…

मुसळधार पावसामुळे वाहून गेला होता;रस्ता तातडीने वाहतुकी योग्य करा अधिकाऱ्यांना सूचना…

⚡देवगड ता.१७-: देवगड तालुक्यातील मोंड गावातील कॉलेज ते गावठाण कडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाटीचा सुमारे 200 मीटरचा रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून गेला होता याची पाहणी आमदार नितेश राणे यांनी केली रस्ता तातडीने वाहतुकी योग्य करा अशी सूचना संबंधित यंत्रणेला आमदार राणे यांनी दिली.

देवगड तालुक्यात शनिवारी सकाळपासून पावसाने सुरूवात केली असून पहिल्याच पावसाचा फटका मोंड गावाला बसला होता. या गावातील मोंड कॉलेज ते गावठणकडे जाणारा सुमारे 200 कि. मी. चा डांबरी रस्ता मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी वाहून गेला आहे. या रस्त्यावरील घाटीरस्ता अक्षरशः उखडून गेला आहे. या घाटीरस्त्याचे डांबरीकरण पूर्णतः पाण्यात वाहून गेले आहे. या रस्त्यानजीक जलजीवन योजनेच्या पाईपलाईनसाठी गटारे खोदण्यात आली होती. मात्र, हे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे या गटारात पावसाचे पाणी अडून घाटीरस्ता उखडून गेला आहे. रस्त्यानजीक चार ते पाच फूटाचे चर पडले असून नजीकच्या वाडीत या चराची माती पाण्याच्या बदललेल्या प्रवाहाने वाहून जात तेथील घरांच्या मागील बाजूने घरात घुसली होते. यात सुमारे पाच ते सहा घरे बाधित झाली होती. वाडीकडे जाणारा हा घाटीरस्ता शेतकऱ्यांची कायमस्वरुपी ये- जा करण्यासाठीची मार्ग असून घाटीच्या वाहून गेलेल्या मातीमुळे या घाटीरस्त्यावर चालणेही मुश्किल झाले होते. या सर्व गोष्टींची पाहणी आमदार नितेश राणे यांनी करून संबंधित यंत्रणेला त्या पद्धतीच्या सप्त सूचना देखील यावेळी दिल्या

आमदार नितेश राणे यांनी तातडीने मोड गावाचा दौरा केला व रस्त्याची पाहणी केली त्यावेळी रस्त्याची अवस्था अतिशय बिकट असल्याचे निदर्शनास येतात संबंधित यंत्रणेला तातडीने रस्त्याचे डागडुजी करण्याच्या सूचना आमदार राणे यांनी केल्या यावेळी त्यांच्या समावेत उपसरपंच अभय बापट,जिल्हा उपाध्यक्ष संदीप साटम, बाळ खडपे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page