⚡सावंतवाडी ता.१७-: पदवीधर निवणूकीवर सावंतवाडी तालुक्यातील ग्रा.पं.कर्मचा-यांनी बहिष्कार टाकत मतदानाचा हक्क बजाविणार नाही असा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. गटविकास अधिकारी काही ग्रामसेवकांच्या प्रशासनातील अनपढपणाला पाठीशी घालत असल्यामुळे तसेच अन्य गोष्ठींचे समर्थन करत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे संघटना अध्यक्ष हनुमान केदार व सचिव अशोक जाधव यांनी सागितले.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बैठक आज पार पडली या बैठकीत तालुक्पातील ग्रा.पं.कर्मचा-यांवर वारंवार सेवा – विषयक बाबींबाबत अन्याय केला जात आहे.यात काही ग्रामसेवक यांच्या प्रशासनातील अनपढपणामुळे चुकीचे निर्णयांचे समर्थन केले जात आहे.गट विकास अधिकार्यांकङे याबाबत तक्रार केली असता अशा कामचुकार ग्रामसेवकांना पाठीशी घातले जात आहे.काही ग्रामसेवकांकङून प्रत्येक गोष्टीचे मार्गदर्शन मागविले जाते.मग शासन यांना वेतन देते ते कशाच ? असा प्रश्न उपस्थित होतो कायद्यातील तरतुदींचा काही ग्रामसेवकांना अभ्यास नसल्याने असे प्रकार घङत आहे. खर म्हणजे काही ठिकाणी ग्रामसेवक कॅश बुक,मासिक सभा इतिवृत्त ,वर्गीकरण ही स्वत:ची कामे ग्रा,पं.कर्मचार्यांकङून लिहून घेतात,काही ठिकाणी पंचायत समिती मध्ये जातो असे सांगून आपल्या वैयक्तीक कामे करतात. मात्र गावात ग्रा.पं.कर्मचार्यांना याची उत्तरे द्यावी लागतात.
शासन निर्णयानूसार ग्रामसेवक यांनी मुख्यालयी राहाणे बंधनकारक असताना सुध्दा बर्याच ठिकाणी मुख्यालयी राहात नाही.गट विकास अधिकार्यांनी अशा संबधित ग्रामसेवकांवर कारवाई केली जात नाही.ग्रा.पं.कर्मचा-यांचे गट स्तरावरील तक्रारीचे निवारण केले जात नसल्याने प्रशासनाचा निषेध म्हणून 26 जुन रोजी होणा-या पदवीधर निवङणूकीत पदवीधर ग्रा.पं.कर्मचारी यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.