⚡मालवण ता.१७-:
भारतीय मत्स्यकी सर्वेक्षण गोवा बेस यांच्यामार्फत ग्लोलिटर प्रकल्पांतर्गत चिवला बीच येथे जनजागृती फेरी व प्लास्टिक कचरा स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये मच्छीमार, नौका मालकांना समुद्रात टाकल्या जाणाऱ्या प्लास्टिकबाबत राजू नागपुरे यांनी माहिती दिली. तसेच किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर, प्रधान वैज्ञानिक डॉ. प्रदीप, क्षेत्रीय प्रबंधक डॉ. एस. रामचंद्रन, सहायक मत्स्यविकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर, श्रुतिका गावडे, परवाना अधिकारी मुरारी भालेकर, सागरमित्र व सागरी सुरक्षा पर्यवेक्षक, सिंधुदुर्ग मच्छीमार सहकारी संस्थेचे सचिव योगेश मंडलिक, मणचेकर रापण संघाचे अध्यक्ष विश्वजीत मणचेकर आदी उपस्थित होते.