Headlines

Global Maharashtra Breaking News

वीज आयोग’ यंत्रणा प्रबळ झाली पाहिजे…

प्रताप होगाडे:कुडाळ मध्ये वीज ग्राहकांचा जनता दरबार:ग्राहकांनी वाचला वीज समस्यांचा पाढा.. ⚡कुडाळ ता.०४-: राज्य सरकार आणि आयोग या दोघांची जरब महावितरण कंपनीवर असली पाहिजे. पण वीज नियामक आयोगाचा धाक आज कोणालाच नाही. या उलट महावितरण कंपनी मालक झालेली आहे. या कंपनीचा सरकारमधील ऊर्जा विभाग उजवा हात आणि आयोग डावा हात झाला आहे, मालकी महावितरण कंपनीकडे…

Read Full News

जानवली रामेश्वर नगर मधील विवाहित पुरुष बेपत्ता…

⚡कणकवली ता.०४-: जानवली रामेश्वर नगर येथील आणि मूळ कलमठ बँक कॉलनी येथील रहिवासी विजय प्रभाकर तेली (वय 32) हा 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून बेपत्ता असल्याची फिर्याद त्याची पत्नी वेदिका तेली हिने कणकवली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. विजय तेली हा 3 जुलै रोजी मी घरी परत येणार नाही असे सांगून घराबाहेर पडला. त्याचा…

Read Full News

कुडाळ तालुक्यात सीएम माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ…

मुळदे ग्राम पंचायतीत मार्गदर्शन शिबीर:तहसीलदार वीरसिंग वसावे य यांचा पुढाकार.. ⚡कुडाळ ता.०४-: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजना पासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शासनाने अतिशय सुटसुटीत आणि सहज उपलब्ध असे कागदपत्र उपलब्ध केले आहेत  त्याचा लाभ सर्व लाभार्थ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी आज मुळदे येथे केले .कुडाळ तालुक्यात ही…

Read Full News

कुंडई ते पंढरपूर पायी वारीचे बांद्यात स्वागत…

⚡बांदा ता.०४-: संत सोहिरोबानाथ वारकरी संप्रदाय ,कुंडई – गोवाच्या वतीने कुंडई येथून पंढरपुरला जाणाऱ्या आषाढी पायी वारीचे बांदा येथिल संत सोहिरोबानाथ आंबिये मठात  स्वागत करण्यात आले. संत सोहिरोबानाथ वारकरी संप्रदाय ,कुंडई तर्फे गतवर्षीपासून या पायी वारीचा आरंभ झाला असून यंदाचे वारीचे दुसरे वर्ष आहे.   शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत विठुनामाच्या जयघोषात बुधवार दि.३ जुलै रोजी गोव्यातून…

Read Full News

भाजपच्या माध्यमातून सुधीर आरीवडेकर यांचा वाढदिवस संजू परब यांनी केला साजरा…

सावंतवाडी ता.०४-: माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांचा वाढदिवस सावंतवाडी भाजपच्या माध्यमातून संजू परब यांच्या उपस्थितीत व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांकडून यावेळी आरीवडेकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे,आंनद नेवगी,मनोज नाईक,उदय नाईक,केतन आजगावकर,मोहिनी मडगावकर,विनोद सावंत, सत्यवान बांदेकर ,अजय सावंत, ज्ञानेश्वर सावंत, सचिन साटेलकर, सविता टोपले, मेघना साळगावकर हेमंत बांदेकर,गुरू…

Read Full News

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत लेईशा पराडकर मालवण तालुक्यात प्रथम…

⚡मालवण ता.०४-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता पाचवी) मालवण रेवतळे येथील जि. प. प्राथमिक शाळा रेवतळेचे विद्यार्थिनी लेईशा नारायण पराडकर हिने मालवण तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकवितानाच जिल्हा शहरी गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक पटकाविला आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती ….

Read Full News

स्व. संजय नाईक यांच्या निधनाबद्दल १० रोजी कट्टा येथे शोकसभा…

⚡मालवण ता.०४-: कट्टा येथील वराडकर हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. संजय नाईक यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवार दि. १० जुलै रोजी दुपारी ३ वाजता कट्टा येथील वराडकर हायस्कुलच्या सिद्धिविनायक सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा व वराडकर हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज कट्टा, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुल…

Read Full News

माजगाव नजदीक आयशर ट्रक ला अपघात…

कोणाला दुखापत नाही: रस्त्याच्या मारलेले चर न बुजवल्याने अपघात घडला; अजय सावंत यांचा आरोप.. सावंतवाडी ता.०४-: माजगाव नजदीक आयशर ट्रकला अपघात झाला असून सुदैवाने यात कोणालाही जीवितहानी नाही, मात्र दर्शनी भागाचे ट्रकचं किरकोळ नुकसान झाले आहे.मात्र हा अपघात रस्त्याच्या कडेला केबल साठी मारण्यात आलेल्या चरमुळे घडला असल्याचा आरोप भाजप पदाधिकारी अजय सावंत यांनी केला आहे,…

Read Full News

कोलझर येथील समाजसेवा हायस्कूल मध्ये वसंतराव नाईक यांची जयंती साजरी…

⚡बांदा ता.०४-: कोलझर येथील समाजसेवा हायस्कूल मध्ये वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री राठोड यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांनी केलेल्या कार्याची तपशिलवर माहिती श्री राठोड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. त्यांनी वकिली करताना गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. ते शेतकरी असल्याने शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्या त्यांना अवगत होत्या….

Read Full News

संच मान्यता निकष रद्द करा…

राजन तेली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निवेदनद्वारे केली मागणी… ⚡सावंतवाडी ता.०४-: शाळा मधील संच मान्यता निकष 15 मार्च 2024 चा शासननिर्णय रद्द करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार राजन तेली यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी वर्षा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना सादर केले यावेळी उद्योग…

Read Full News

You cannot copy content of this page