पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत लेईशा पराडकर मालवण तालुक्यात प्रथम…

⚡मालवण ता.०४-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता पाचवी) मालवण रेवतळे येथील जि. प. प्राथमिक शाळा रेवतळेचे विद्यार्थिनी लेईशा नारायण पराडकर हिने मालवण तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकवितानाच जिल्हा शहरी गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक पटकाविला आहे.

फेब्रुवारी २०२४ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती . या परीक्षेत कुमारी लेईशा पराडकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या परीक्षेसाठी तिला श्रीमती देशमुख मॅडम, गोगटे सर, कुमारी. मनाली वेंगुर्लेकर व पालकांचे मार्गदर्शन लाभले.

कुमारी लेईशा हिने यापूर्वी वक्तृत्व, निबंध तसेच क्रीडा स्पर्धेतही यश मिळविले आहे. कुमारी लेईशा ही चौके मांडखोल जि. प. शाळेचे उपशिक्षक नारायण पराडकर यांची तर मालवण पंचायत समिती मधील ग्रामपंचायत विभागातील वरिष्ठ सहाय्यक सौ. वर्षा पराडकर यांची ती कन्या आहे.

कुमारी लेईशा हिने मालवण तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावल्याचे समजताच मालवणचे गटविकास अधिकारी आत्मज मोरे तसेच मालवणच्या नायब तहसीलदार श्रीमती. श्रद्धा चौघुले यांनी पेढा भरवून व भेट वस्तू देऊन तीचे अभिनंदन केले. यावेळी प्राथमिक शिक्षक बंडू राठोड तसेच पराडकर कुटुंबीय उपस्थित होते.

You cannot copy content of this page