स्व. संजय नाईक यांच्या निधनाबद्दल १० रोजी कट्टा येथे शोकसभा…

⚡मालवण ता.०४-: कट्टा येथील वराडकर हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. संजय नाईक यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवार दि. १० जुलै रोजी दुपारी ३ वाजता कट्टा येथील वराडकर हायस्कुलच्या सिद्धिविनायक सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा व वराडकर हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज कट्टा, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुल कट्टा डॉ. दादासाहेब कला वाणिज्य महाविद्यालय कट्टा, वराडकर हायस्कुल आजी माजी विद्यार्थी तसेच संजय नाईक मित्रपरिवार यांनी ही शोकसभा आयोजित केली आहे. तरी या शोकसभेस सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page