कोलझर येथील समाजसेवा हायस्कूल मध्ये वसंतराव नाईक यांची जयंती साजरी…

⚡बांदा ता.०४-: कोलझर येथील समाजसेवा हायस्कूल मध्ये वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री राठोड यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.


यावेळी त्यांनी केलेल्या कार्याची तपशिलवर माहिती श्री राठोड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. त्यांनी वकिली करताना गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. ते शेतकरी असल्याने शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्या त्यांना अवगत होत्या. महाराष्ट्राचे महसूल मंत्र्यापासून मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी पदे भूषविली. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद तब्बल वर्षाहून अधिक काळ सांभाळले. त्यांना महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक मानले जाते, तसेच त्यांनी औद्योगीकरण धोरणाचा अवलंब केला.
त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून १ जुलै रोजी कृषि दिन साजरा केला जातो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद तारी यांनी केले तर आभार सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री पांगुळ यांनी मानले.

You cannot copy content of this page