⚡कणकवली ता.०४-: जानवली रामेश्वर नगर येथील आणि मूळ कलमठ बँक कॉलनी येथील रहिवासी विजय प्रभाकर तेली (वय 32) हा 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून बेपत्ता असल्याची फिर्याद त्याची पत्नी वेदिका तेली हिने कणकवली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. विजय तेली हा 3 जुलै रोजी मी घरी परत येणार नाही असे सांगून घराबाहेर पडला. त्याचा नातेवाईक तसेच शेजाऱ्यांकडे शोध घेऊनही सापडला नाही. विजय तेली हा खाजगी चालक म्हणून काम करत असून पत्नी मुलगा वडिलांसह जानवली येथे राहत असे. विजय तेली याचा रंग सावळा असून उंची 5 फूट 4 इंच आहे. दाढी पूर्ण वाढलेली आहे.
जानवली रामेश्वर नगर मधील विवाहित पुरुष बेपत्ता…
