Headlines

Global Maharashtra Breaking News

दळवी घराण्याचा १४ रोजी आंबडोस व्हाळवाडी येथे गोंधळ…

⚡ओरोस ता. ०९-: क्षत्रिय गडकरी मराठा समाजातील दळवी घराण्याचा गोंधळ उत्सव १४ मे रोजी मालवण तालुक्यातील आंबडोस व्हाळवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. क्षत्रिय गडकरी मराठा समाजातील दळवी घराण्याची आकार भवानी आंबडोस व्हाळवाडी येथील दळवी घरात वास्तव्यास आहे. तिचा गोंधळ उत्सव दळवी भावकी आयोजित…

Read More

केसरी धनगरवाडीत कमी दाबाचा वीज पुरवठा…

नवीन टान्सफार्मर कार्यान्वित करा ; उपसरपंच संदीप पाटील यांची मागणी. ⚡सावंतवाडी ता.०९-: केसरी – धनगरवाडीत कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने सध्या कडाक्याच्या उन्हाळ्यात धनगर बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या वाडीत नविन ट्रान्सफार्मर मंजूर आहे मात्र त्याचे काम गेले तीन महिने प्रलंबित आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून याची तात्काळ दखल घेऊन हा ट्रान्सफॉर्मर…

Read More

बुलेरो टेम्पोला पाठीमागून खाजगी आराम बसची धडक…

शिरगाव धोपटेवाडी येथील घटना:आराम बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान.. ⚡देवगड ता.०९-: देवगड नांदगाव मार्गावरील शिरगाव धोपटेवाडी कोणीचे वळणं येथे आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास खाजगी आराम बस व महिंद्रा बोलेरो टेम्पो यामध्ये अपघात झाला. या अपघातात खाजगी आराम बसची दर्शनी भागाची काच फुटून नुकसान झाले .मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही घटनास्थळावरून उपलब्ध झालेल्या…

Read More

राजवाड्यात कर्नाटक उडपीतील यक्षगान नाट्यप्रयोग होणार मराठीत सादर …

11 मे रोजी आयोजन :युवराज लखमराजे भोसले यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी राजवाड्याच्या प्रांगणात खुल्या रंगमंचावर कर्नाटक उडपी येथील “यक्षगान” प्रयोग मराठीमध्ये सादर होणार आहे. येत्या ११ मे रोजी सायंकाळी सहा वाजता हा प्रयोग होईल अशी माहिती युवराज लखमराजे भोंसले यांनी दिली. यावेळी प्रा. विजयकुमार फातर्पेकर लिखीत ‘दशावतार’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे असं…

Read More

मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेत शिवजयंती उत्साहात साजरी…

⚡मालवण ता.०८-: मालवण येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेत आज छत्रपती शिवाजी महाराज यांची पारंपारिक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.

Read More

देवगड बाजारपेठ येथील व्यापारी श्रीकृष्ण पारकर यांचे निधन…

⚡देवगड ता.०९-: देवगड मधील युवा व्यवसायिक राकेश श्रीकृष्ण पारकर (४२) याचे प्रदीर्घ आजाराने मुंबई येथे बुधवारी मध्यरात्री निधन झाले त्याच्या पश्चात आई भाऊ वहिनी पुतणे असा परिवार आहे देवगड खालची बाजारपेठ येथील हॉटेल गणेश अँड कोल्ड्रिंकचे ते मालक होते काही वर्ष वृत्तपत्र विक्रेते म्हणून काम केले. गुरुवारी दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर देवगड स्मशानभूमी येथे…

Read More

कळसुलीत 12 मे रोजी स्नेहमेळावा…

⚡कणकवली ता.०९-: कळसुली शिक्षण संघ, मुंबई संस्थेच्या प्रेरणेने आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या सहकार्याने रविवार 12 मे रोजी सकाळी 9 वाजता कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड आर्टस्, कळसुली येथे स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. प्रशालेचे माजी विद्यार्थी तसेच आजी व माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ, माहेरवाशींनी, हितचिंतक, संस्था पदाधिकारी व…

Read More

कोलगावमध्ये १६ ते २० मे दरम्यान त्रैवार्षिक पडली उत्सव…

⚡सावंतवाडी ता.०९-: कोलगाव ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी पंचायतन देवस्थानचा त्रैवार्षिक पडली उत्सव १६ ते २० मे दरम्यान संपन्न होत आहे. त्यानिमित्त पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार १६ मे रोजी सायंकाळी ४ वाजता कुळघर चंदन धुरी यांच्या घराकडून तरंगकाठीसह वाजत गाजत श्री देवी सातेरी मंदिर येथे प्रस्थान व मुक्काम होईल. शुक्रवार १७…

Read More

साटम महाराज जयंती निमित्त दानोलीत उद्या विविध कार्यक्रम…

सावंतवाडी ता.०९-: कोकणातील संतांचे संत शिरोमणी दाणोली येथीलसाटम महाराजांचा जयंती उत्सव अक्षय तृतीयेच्या सुवर्ण पर्वणीला शुक्रवार १० एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त साटम महाराजांच्या समाधी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीच्या साईबाबांना समकालिन असलेल्या साटम महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. यानिमित्त समाधी मंदिरात पहाटे ५ वाजता काकड आरती, पहाटे ५:१५…

Read More

तांबळडेगच्या शिला कोचरेकर यांचे दुःखद निधन…

⚡देवगड ता.०९-: तांबळडेग गावच्या रहिवासी श्रीमती शिला श्रीकांत कोचरेकर यांचे ९ मे रोजी दुपारी तीन वाजता कांदिवली मुंबई येथे अल्प आजाराने दुःखद निधन झाले. तांबळडेग येथील महिलांना भजनाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न करून भजन मंडळ काढण्यात पुढाकार घेतला होता. त्या नेहमी धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होऊन सहकार्य करीत असत. मृत्यूसमयी त्या ८५ वर्षाच्या होत्या….

Read More
You cannot copy content of this page