माणगावात ४३ हजाराची चोरटी दारू जप्त…

दोघांवर गुन्हा दाखल:कुडाळ पोलिसांची कारवाई..

कुडाळ : तालुक्यात माणगाव बाजार येथे चोरटी बेकायदेशीर दारूविक्री वर कुडाळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४३ हजार ७१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सचिन रमाकांत कोरगावकर ,वय 45 वर्षे, राहणार माणगाव बाजार ता.कुडाळ, आणि आत्माराम उर्फ मनोज मनोहर नार्वेकर वय.४४ वर्षे राहणार माणगाव बाजार, तालुका कुडाळ या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी हि कारवाई करण्यात आली. या प्रकरणी माणगाव दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार सखाराम सुरेश भोई यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव बाजार येथे चोरटी गोवा दारू विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेन्द्र मगदूम यांना मिळाल्या वरून पोलीस हवालदार.कृष्णा केसरकर, पोलीस हवालदार महेश जळवी,पोलीस नाईक रुपेश सारंग ,महिला पोलिस शिपाई श्रीमती प्रणाली रासम, माणगाव दुरक्षेत्र अंमलदार पोलीस हवालदार महेश भोई, आनंद पालव यांनी रविवारी ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी छापा मारला. या छाप्यात पाच कागदी पुठ्ठ्याच्या बॉक्स,मध्ये गोवा बनावटीच्या डॉक्टर ब्रँडीच्या २४८ बाटल्या आढळून आल्या. त्यांची एकूण किंमत २८ हजार ८०० रुपये आहे. तर एका सिमेंट वापराच्या प्लास्टिक गोणीत नॅशनल कमांडर एक्सएक्सएक्स असे लेबल असलेल्या ७६ बाटल्या आढळून आल्या. त्यांची एकूण किंमत रुपये ९ हजार १२० आहे. त्याच सिमेंटच्या गोणीत गोल्डन एस ब्लु फाईन व्हिस्की असे लेबल असेल्या ८ बाटल्या आढळल्या. त्याची एकूण किंमत ३ हजर ८४० रुपये आहे. तर त्याच प्लास्टिकच्या गोणीत प्रीमियम रोमानोव्ह व्होडका असे लेबल असलेल्या एकूण १३ बाटल्या आढळून आल्या. त्यांची एकूण किंमत १ हजार ९५० आहे. असा एकूण ४३ हजार ७१० रुपये किमतीचा माल आढळून आला.
यातील दोन्ही आरोपींनी आपल्या दोघांच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने आपसात संगनमत करून ही गोवा बनावटीची दारू गैर कायदा बिगर परवाना स्वतःच्या ताब्यात विक्री करण्याचे उद्देशाने बाळगल्या स्थितीत मिळून आला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई),81,83 प्रमाणे,हे कारवाई करण्यात आली. दरम्यान या दोन्ही संशयितांना अजून अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. पालव करत आहेत.

You cannot copy content of this page