श्रावण सोमवार निमित्त आंबोली हिरण्यकेशी येथे भाविकांची गर्दी

आंबोली ता.०५-: येथील हिरण्यकेशी येथे श्रावण सोमवार निमित्त भाविकांनी गर्दी केली होती. यावर्षी श्रावण सोमवार ला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.७१ वर्षानंतर या वर्षी ५ श्रावण सोमवार आले आहेत. आज आंबोलीत भाविकांनी तसेच पर्यटक आणि ग्रामस्थांनीही हिरण्यकेशी येथे दर्शन घेतले.पूजा, अभिषेक, नवस ,नारळ ठेवणे आदी धार्मिक कार्यक्रम भाविकांनी केले.

हिरण्यकेशी नदीचा उगम देखील याचं गुहेतून आहे.ही ८८ किलोमीटर नदी वाहते. या ठिकाणी शिवलिंग आहे.गणपती,आणि गंगेची म्हणजेच हिरण्यकेशी देवी ची मूर्ती आहे. उगम या गुहेत होऊन नदी जिल्ह्यातील पूर्व वाहिनी असून आजरा रामतिर्थ येथून गडिंग्लज येथून कर्नाटक गोकाक येथे जाऊन मग अरबी समुद्रात जाते.

You cannot copy content of this page