सिंधुदुर्गनगरी ता ५
सेवाज्येष्ठ शिक्षकामधून गुणवत्तेनुसार विज्ञान गणित विषयासाठी रिक्त पदांच्या मर्यादित पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्याचे शासनाचे निर्देश असताना सदर निर्देश डावलुन होत असलेल्या पदोन्नती विरोधात लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना , पदभरतीपूर्व सुरु असलेल्या गणित व विज्ञान विषय समूहात पदवीधर पदी पदोन्नती देण्याची कार्यवाही करणेत येत आहे.
त्यामध्ये B.sc उत्तीर्ण झालेल्या कार्यरत प्राथमिक शिक्षकांना , पदभरतीपूर्व गणित व विज्ञान विषय समूहात पदवीधर पदी पदोन्नती देण्याची कार्यवाही करताना डावलण्यात आले आहे.याबाबत लक्ष वेधण्यासाठी
धरणे आंदोलन छेडण्यात आलेले आहे. अभियोग्यता व बुध्दीमता चाचणी आधारे जिल्हा परिषदांतर्गत पदभरतीपूर्वी सध्या जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत शिक्षकांपैकी गणित व विज्ञान याविषयासाठी रिक्त पदांच्या मर्यादेत सेवाजेष्ठ शिक्षकांमधून गुणवत्तेनुसार विज्ञान / गणित विषयांसाठी रिक्त पदांच्या मर्यादेत पदोन्नतीची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश आहेत , सदर निर्देश डावलून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत कार्यवाही होत आहे .
तरी शासन निर्देश डावलुन कार्यवाहि करणाऱ्या व वरिष्ठ कार्यालयाचे आदेशांचे पालन न करणाऱ्या , संबंधित कार्यवाही करण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी , कारवाई न झाल्यास शनिवार दिनांक १० ऑगस्ट रोजी पुन्हा सिंधुदुर्ग जिल्हा समोर धरणे आंदोलन छेडण्यात येइल , असा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पाताडे यांनी दिला आहे .यावेळी अविनाश आवटे, राहुल अस्पतवार, वैभव तळेकर, आनंदा वरुटे, अपय्या हिरेमठ, संदीप निउगरे ,सागर खटावकर ,स्नेहल मुळे, अमोल कोळी, राजेंद्र पाटील, नितीन पाटील, अमित टक्केकर आदी उपस्थित होते.
