⚡सावंतवाडी ता.०५-: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर भाजप कार्यकारणीची बैठक जिल्हा बँक अध्यक्ष तथा सावंतवाडी निरीक्षक मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.
या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात शहराच्या मोर्चेबांधणी संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्येक बूथ सदस्यांच्या संख्यासह काही कार्यकारणीत फेरबदल करण्याबाबत चर्चा करण्यात आली असून, पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे.
यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, महेश सारंग, सुधीर आरीवडेकर, मोहिनी मडगावकर, मंदार नार्वेकर. आधी प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
