Headlines

Global Maharashtra Breaking News

चौके येथे खासगी लक्झरी बसेसमुळे होतेय वाहतूक कोंडी…

⚡मालवण ता.११-:एप्रिल, मे या कालावधीत चौके येथील मुख्य नाक्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नाक्यावर वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे चौके सरपंच गोपाळ चौकेकर, उपसरंपच पी. के. चौकेकर यांनी मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची भेट घेऊन केली. चौके येथील मुख्य नाक्यावर मालवण, कसाल, कुडाळ येथून मुंबईकर पर्यटक मोठ्या संख्येने येतात….

Read More

बांदा शहरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार अवकाळी पावसाची जोरदार हजेरी…

⚡बांदा ता.११-: बांदा शहर व परिसराला आज सायंकाळी विजांच्या गडगडाटासह मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी वर्गासह सर्वांचीच तारांबळ उडाली. अवकाळी पावसाने आंबा, काजू बागायतदार मात्र हवालदिल झालेत. अवकाळीच्या पहिल्याच दिवशी वीज पुरवठा खंडित झाला. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.    आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. हवामान…

Read More

वेंगुर्ला येथे ‘यक्षगान‘चे मराठीत सादरीकरण…

⚡वेंगुर्ला ता.११-: भारतीय लोकरंगभूमीचे एक अनमोल लेणे म्हणून प्रसिद्ध असलेल्या कनार्टकातील यक्षगान हा नाट्यप्रकार रविवार दि. १२ मे रोजी सायंकाळी ७ वाजता कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात मराठीतून सादर होणार आहे. या नाटकासाठी महाभारतातील एका महत्त्वाच्या भागावर ‘चक्रव्यूह‘ हे कथानक निवडले आहे.

Read More

सर्व्हिस रोडची रुंदी कमी केल्याने बांद्यातील ग्रामस्थ आक्रमक…

अधिकारी धारेवर:ठेकेदाराच्या विरोधात नाराजी;उड्डाणपुलाचे काम रोखले.. ⚡बांदा ता.११-: मुंबई गोवा महामार्गावरील बांदा येथे सुरू असलेल्या उड्डाणपूलाचे काम बेकायदा सुरु असून गोव्याच्या दिशेने जाणारा सेवा रस्ता कमी रुंदीचा असल्याचे सांगत बांदा ग्रामस्थ आज आक्रमक झालेत. उड्डाणंपुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.बांदा शहराचे विस्तारीकरण पाहता तसेच महामार्गावरून बांदा शहरात, दाणोली मार्गावर व…

Read More

आरोंदा गावात शिवकालीन वस्तुंचे भव्य प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी तालुका मनसेने दिली भेट:भावी पिढीसाठी असे उपक्रम दिशादर्शक ठरतील.. ⚡सावंतवाडी ता.११-: आरोंदा गावातील समस्त ग्रामस्थांच्या वतीने शिवकालीन वस्तुंचे भव्य प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून यावेळी भरवण्यात आलेल्या प्रदर्शन भावी पिढीला उपयुक्त मार्गदर्शन घडवणारे ठरेल या कार्यक्रमास आलेल्या सर्व भक्त भाविकांनी आणि शिवप्रेमीनी या शिवकालीन वस्तुंच्या प्रदर्शनास येऊन वस्तुची माहीती घेतली. या कार्यक्रमाचे संयोजक सौ….

Read More

मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे गरजू लाभार्थ्यांना धनादेश प्रदान…

⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम मध्ये सामंत ट्रस्ट मुंबई तर्फे गरजू व्यक्तींना धनादेश प्रदान करण्यात आले. डिंगणे येथील रक्तदाब व्याधीने पिडित प्रकाश सुतार, मोरगाव येथील मधुमेह आणि रक्तदाब या आजाराने पिडीत शहाजी सावंत,कोंडूरे मळेवाड येथील अर्धांगवायू आणि अपंगत्व असलेले सुरेश पालयेकर आणि मधुमेह आणि रक्तदाब पिडित चांदणी मुळीक,बिरोडकर टेंब सावंतवाडी येथील रक्तदाब…

Read More

बांद्यात वाहतुक कोंडीचा समस्या…

वाहतुक धीम्या गतीने सुरु: सुट्ट्या सुरू झाल्याने गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला.. बांदा/प्रतिनिधीसुट्ट्या सुरु झाल्याने व गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने बांदा शहराला दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर सुरु असल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. गेल्या चार दिवसात वाहनचालकांना अभूतपूर्व अश्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत…

Read More

दाणोलीच्या समर्थ साटम महाराज जंयती उत्सव अलोट गर्दीत साजरा…

⚡सावंतवाडी ता.११-: योगियांचे योगी असलेल्या दाणोली येथील साटम महाराजांचा जयंती उत्सव शुक्रवारी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या अक्षय तृतीयेच्या सुवर्ण पर्वणीला साटम महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. साटम महाराजांच्या या जयंती उत्सवात भाविक साटम महाराज चरणी लीन झाले. यानिमित्त समाधी मंदिरात पहाटे काकड आरती, त्यानंतर अभ्यंगस्नान, झाल्यानंतर सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांच्याहस्ते…

Read More

यशवर्धन राणे यांना पदवीधर आमदार म्हणून विधान परिषदेत पाठवा…

तरुणांची मागणी: सर्व युवकांचा राणे यांच्या उमेदवारीसाठी पाठिंबा.. ⚡कुडाळ ता.११-: युवा फोरमचे अध्यक्ष अॅड. यशवर्धन राणे यांना कोकण पदवीधर मतदार संघातुन उमेदवारी मिळाल्यास राणे यांना युवकांचा पुर्ण पाठिबा असेल अशी भुमिका पत्रकार परिषदेत युवा फोरमच्या वतीने भुषण गावडे व दर्शन पाटकर यांनी जाहीर करीत, यशवर्धन राणे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी करणार असल्याचे ही त्यांनी…

Read More

कुणकेश्वर चरणी हजारो देवगड हापूसची आरास…

सलग दहाव्या वर्षीही हापूस आंब्याच्या आरासची जपली परंपरा.. ⚡देवगड ता.११-: देवगड म्हटलं की चटकन तोंडाला पाणी सुटतं, आणि चटकन नजरेसमोर येतो तो देवगड हापूस.अशी देवगड हापूस ची ख्याती जगभरात पसरली आहे. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावच्या इतिहासात ११ मे हा दिवस कुणकेश्वरला देवगड हापूस दिवस म्हणून साजरा केला जातो. याचं कारणच तसंच आहे.कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार…

Read More
You cannot copy content of this page