इन्सुली येथील कृष्णा मेस्त्री यांचे उपचारादरम्यान निधन…

बदलापूर फार्मा कंपनीतील स्फोटात झाले होते गंभीर जखमी

बांदा/प्रतिनिधी
बदलापूर-माणकिवली औद्योगिक वसाहतीतील फार्मा कंपनीत सोमवारी स्फोट होऊन गंभीर जखमी झालेल्या घनश्याम कृष्णा मेस्त्री (वय 35) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


हा स्फोट इतका भीषण होता, की रिऍक्टरचा १०० किलो वजनाचा एक भाग उडून तब्बल ४०० मीटर लांब असलेल्या एका चाळीवर जाऊन कोसळला. या चाळीत सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावातील मेस्त्री कुटुंब राहत होते. सदरचा रिऍक्टर पहाटे गाढ झोपेत असणाऱ्या या कुटुंबाच्या बेडवर कोसळला. पायावर पडल्याने त्याचे दोन्ही पाय निकामी झाले होते. तर त्याची पत्नी धनश्री हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांची छोटी मुलगी ख्याती हिच्या सुद्धा पायाला दुखापत झाली आहे. घनश्याम यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू होते. तर त्यांची पत्नी व मुलगीवर बदलापूर येथे उपचार सुरू आहेत.
सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास येथील एका फार्मा कंपनीत भीषण स्फोट झाला. या कंपनीतील रिऍक्टर जवळील रिसिव्हर टॅंकमध्ये स्फोट होऊन आग लागली आणि त्याचा सुमारे शंभर किलो वजनाचा लोखंडी भाग उडून चारशे मीटरवर असलेल्या खरवई गावातील एका चाळीवर पडला. हा लोखंडी भाग घराचा छताचा पत्रा फोडून घरात साखर झोपेत असलेल्या कुटुंबातील कर्ता पुरुष घनश्याम मेस्त्री यांच्या पायावर पडला.

You cannot copy content of this page