Headlines

Global Maharashtra Breaking News

गांजा सेवन केल्याप्रकरणी तिघांना ताब्यात…

सावंतवाडी पोलिसांची कारवाई; महेश सारंगांकडून कारवाईबाबत पोलिसांचं कौतुक.. सावंतवाडी : शहरालगतच्याकोलगाव येथे गांजा सेवन केल्याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलिसांकडून आज सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. सापळा रचून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत महेश सरांग यांनी कौतुक केला.

Read Full News

सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळातर्फे यावर्षीही महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे भव्य आयोजन…

⚡मालवण ता.१२-: नारळी पौर्णिमे निमित्त मालवणात सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने गेली दहा वर्षे घेण्यात येणारी आणि राज्यस्तरावर पोहचलेली महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा यावर्षीही मालवण बंदर जेटी येथे होणार आहे, यासाठी जागेची पाहणी व निश्चिती करण्यात आली आहे, यावर्षीही या स्पर्धेत लाखो रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव होणार आहे, असे सौ. शिल्पा खोत यांनी मालवण बंदर…

Read Full News

ठाकरे शिवसेनेचे सचिव आमदार मिलिंद नार्वेकर १३ ऑगस्टला सिंधुदुर्गात…

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती:कार्यकर्त्यांशी संवाद साधून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवाराबद्दल मते जाणून घेणार.. कणकवली : ठाकरे शिवसेनेचे सचिव तथा आ. मिलिंद नार्वेकर हे शिव सर्वेक्षण अभियानांतर्गत १३ व १४ ऑगस्ट रोजी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. या निमित्ताने १३ ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका व विधानसभा उमेदवारा संदर्भात चर्चा करणार आहेत….

Read Full News

खो-खो क्रीडास्पर्धेत कलंबिस्त इंग्लिश स्कूलच घवघवीत यश…

सावंतवाडी :  येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय खो-खो क्रीडास्पर्धेत कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने अंतिम सामना जिंकत घवघवीत यश संपादन केले व त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक प्रकाश पावरा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष शिवाजी सावंत, सचिव यशवंत राऊळ, चंद्रकांत राणे व सर्व…

Read Full News

महायुतीत जे ‘आमदार’ तेच उमेदवार…

मंत्री दीपक केसरकर:नितेश राणें सोबत माझे चांगले संबंध ते मोठ्या फरकाने निवडून येतील.. ⚡सावंतवाडी ता.१२-: महायुतीत ज्या ठिकाणी जे आमदार आहेत त्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे घोषित झालेल आहे. अद्याप महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. कार्यकर्तांना नाराज करता येत नाही. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. लवकरच उमेदवारांच्या याद्या जाहीर होतील. अशी माहिती मंत्री…

Read Full News

चौकुळ कबुलायतदार गांवकर जमिन प्रश्नावर १४ रोजी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाची मुंबई बैठक…

मंत्री दीपक केसरकर: मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून चौकुळ जमीन प्रश्न सुटेल.. ⚡सावंतवाडी ता.१२-: चौकुळ कबुलायतदार गांवकर जमिन प्रश्नावर येत्या 14 ऑगस्ट रोजी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकीत चौकुळ जमिन प्रश्न यातून सुटेल अशी माहीती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मुंबई मंत्रालयातून दूरदृष्टीप्रणालीद्वारे…

Read Full News

बांद्यात रंगभरण व शालेय निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

बांदा/प्रतिनिधीयेथील (कै.) सुरेश महादेव कल्याणकर यांच्या स्मरणार्थ गुरुदत्त कल्याणकर यांनी बांदा दशक्रोशीतील जिल्हा परिषद मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या रंगभरण व शालेय निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. पहिली ते चौथी गटासाठी रंगभरण तर पाचवी ते सातवी गटासाठी शालेय निबंध स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे….

Read Full News

दुसऱ्या श्रावण सोमवार श्री क्षेत्र कुणकेश्वरला भाविकांची गर्दी…

देवगड (प्रतिनिधी) १२ ऑगस्ट २०२४ दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र कुणकेश्वर मध्ये दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा सकाळी सहा वाजता आमदार रवींद्र फाटक व सौ जयश्री फाटक यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर भाविकांना शंभू महादेवाच्या दर्शनरांग खुली करण्यात आली.ऊन पावसाचा खेळ ही श्रावण महिन्याची ओळख त्यात व्रत वैकल्याचा महिना असल्यांने श्रावण महिना पवित्र समजला…

Read Full News

सरकारी जमिनी अंतर्गत येणाऱ्या वृक्षांवर दंड आकारला जाऊ नये…

राजन तेली:उपविभागीय वनसंरक्षक अधिकारी नवलकिशोर रेड्डी यांची भेट घेत विविध विषयांवर केली चर्चा.. ⚡सावंतवाडी ता.१२-: कोकणातील माणसाला वृक्षांपासून अनेक गोष्टींचा फायदा होतो आहे. अशावेळी सरकारी जमिनी अंतर्गत येणाऱ्या वृक्षांवर दंड आकारला जाऊन व्यक्तिगत जमिनीवर दंड आकारला जाऊ नये अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे केली. दरम्यान उपविभागीय वनसंरक्षक अधिकारी श्री. नवलकिशोर रेड्डी…

Read Full News

कणकवली शहरातील लटकणाऱ्या वीज वाहक तारांना जोडणारे गार्ड बसविण्याचे काम चालू…

कणकवली : महावितरणकडून आज कणकवली शहरातील लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारांना जोडणारे गार्ड बसविण्याचे काम आज सोमवारी ठिकठिकाणी चालू केले होते. हॉटेल हार्नबील ते भालचंद्र महाराज या रस्त्यासह अन्य ठिकाणी ही कामे चालू होती. आठवड्यापूर्वी कणकवली – टेंबवाडीतील पोलांवरील वीज वाहक तारांपैकी न्युट्रल तार तुटून पडल्याने वीजेचा २३० कि. वॅट दाबाचा वीज पुरवठा दुप्पट होऊन ग्राहकांची…

Read Full News

You cannot copy content of this page