सरकारी जमिनी अंतर्गत येणाऱ्या वृक्षांवर दंड आकारला जाऊ नये…

राजन तेली:उपविभागीय वनसंरक्षक अधिकारी नवलकिशोर रेड्डी यांची भेट घेत विविध विषयांवर केली चर्चा..

⚡सावंतवाडी ता.१२-: कोकणातील माणसाला वृक्षांपासून अनेक गोष्टींचा फायदा होतो आहे. अशावेळी सरकारी जमिनी अंतर्गत येणाऱ्या वृक्षांवर दंड आकारला जाऊन व्यक्तिगत जमिनीवर दंड आकारला जाऊ नये अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे केली.

दरम्यान उपविभागीय वनसंरक्षक अधिकारी श्री. नवलकिशोर रेड्डी यांची श्री.तेली यांनी भेट घेऊन शासनाने वृक्षतोडी संदर्भात केलेल्या दंडाच्या शासननिर्णया संदर्भात सविस्तर चर्चा केली.

या प्रसंगी श्री.शिवाजी गोविंद गवस, श्री. गंगाराम जानु कोळेकर, श्री. ऋषीकेश सीताराम धर्णे , श्री. रामकृष्ण रामचंद्र देउलकर , श्री.सखाराम रामू जंगले, फ्रान्सिस जुवाव लोवो, अभिमन्यू अर्जुन देसाई आदी मंडळी उपस्थित होती.

You cannot copy content of this page