देवगड (प्रतिनिधी) १२ ऑगस्ट २०२४
दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र कुणकेश्वर मध्ये दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा सकाळी सहा वाजता आमदार रवींद्र फाटक व सौ जयश्री फाटक यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर भाविकांना शंभू महादेवाच्या दर्शनरांग खुली करण्यात आली.
ऊन पावसाचा खेळ ही श्रावण महिन्याची ओळख त्यात व्रत वैकल्याचा महिना असल्यांने श्रावण महिना पवित्र समजला जातो.आज दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा आमदार श्री व सौ रवींद्र फाटक, यांच्या हस्ते करण्यात आली.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनीही श्री देव कुणकेश्वराचे सपत्नीक दर्शन घेतले. कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष संतोष लब्दे सरपंच महेश ताम्हणकर संजय आचरेकर , यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावर्षी पाच सोमवार असल्याने कुणकेश्वरला गर्दी वाढेल पहिल्या सोमवार पेक्षा दुसऱ्या सोमवारी भाविकांची गर्दी जास्त प्रमाणात दिसत होती. कॉलेज आटपून युवा व पिढीच्या कलही दुपारी कुणकेश्वरच्या दिशेने वाढलेला पाहायला दिसला. राजापूर परिसरातील काही भाविकांनी रविवारी राजापूर ते कुणकेश्वर असे पदयात्रेचे आयोजन देखील केले होते ही मंडळी श्री देव कुणकेश्वर चे दर्शन घेऊन राजापूरच्या दिशेने पुन्हा रवाना झाली अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे यांनी दिली.
